शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

३५ टक्के नगरसेवक मौनी

By admin | Updated: January 17, 2017 00:53 IST

सभागृहातील कामगिरी : २४ टक्के नगरसेवकांचाच बोलबाला

नाशिक : महापालिकेत सन २०१२ ते १७ या पाचव्या पंचवार्षिक काळात झालेल्या महासभांच्या कामकाजात सुमारे ६५ टक्के नगरसेवकांनी सहभाग नोंदविला, तर ३५ टक्के नगरसेवकांनी एकदाही तोंड उघडले नाही. त्यामुळे मौनी नगरसेवक म्हणूनच त्यांची ओळख राहिली. सुमारे २५ टक्के नगरसेवकांनीच आजवर सभागृहाचे कामकाज चालविल्याचे दिसून आले. पाच वर्षांच्या काळात सभागृहाने मुकणे धरणातून थेट पाणीपुरवठा प्रकल्प, स्मार्ट सिटी योजना, खतप्रकल्पाचे खासगीकरण, नवीन घंटागाड्यांचा ठेका यांसह सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांना मंजुरी देत शहराच्या विकासात भर घातली.  फेबु्रवारीत महापालिकेची सहावी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पाचव्या पंचवार्षिक काळात झालेल्या कामांची मांडणी सत्ताधाऱ्यांकडून केली जाईल तर न झालेल्या व फसलेल्या कामांचा पंचनामा विरोधकांकडून केला जाईल. याशिवाय, मावळत्या पाचव्या पंचवार्षिक काळात झालेल्या महासभांमध्ये नगरसेवकांच्या कामगिरीचाही गाजावाजा प्रचारात सर्वच पक्षांकडून आणि विद्यमान नगरसेवकांकडून केला जाईल. मात्र, पाच वर्षांचा सभागृहाच्या कामकाजाचा धांडोळा घेतला, तर सुमारे ६५ टक्के नगरसेवकांनी सभागृहात विविध प्रश्नांवर झालेल्या चर्चेत सहभाग नोंदविला आहे, तर सुमारे ३५ टक्के नगरसेवकांना पाच वर्षांत एकदाही सभागृहात तोंड उघडले नाही.एसपीव्हीला विरोध करणारे पहिले सभागृहकेंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात ९८ शहरांच्या यादीत नाशिकची निवड झाली. त्यावेळी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाशिक महापालिकेने प्रस्ताव पाठविण्याची वेळ आली. सदरचा प्रस्ताव सभागृहात मंजुरीसाठी आला असता अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळख असलेल्या उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी एसपीव्ही अर्थात कंपनीकरणाचा मुद्दा उचलून धरला आणि त्याला विरोध दर्शविला. पुढे नाशिकनंतर एसपीव्हीला पुणे, मुंबई, नवी मुंबई या शहरांनीही विरोध दर्शविला. परिणामी, नंतर केंद्र सरकारला एसपीव्ही स्थापन करताना त्यात काही महत्त्वपूर्ण बदल करणे भाग पडले.लक्षवेधी आंदोलनेपाच वर्षांच्या काळात काही लक्षवेधी आंदोलनेही या सभागृहात झाली. त्यात प्रामुख्याने, आधी कॉँग्रेसचे नंतर भाजपाचे नगरसेवक बनलेले दिनकर पाटील व लता पाटील या दाम्पत्याने विविध मागण्यांसाठी सभागृहातच सहा दिवस केलेले ठिय्या आंदोलन चर्चेत राहिले तर भाजपाचे प्रा. कुणाल वाघ यांनी डासांचा वाढता उपद्रव लक्षात घेता मच्छरदाणीसह केलेले आंदोलनही लक्षवेधी ठरले. पाणीप्रश्नावरून काळे वस्त्र परिधान करत सेना-मनसेच्या नगरसेवकांनी निषेध नोंदविला, तर राष्ट्रवादीनेही डोक्याला काळ्या पट्ट्या बांधत निदर्शने केली.विकासकामातही मागेमौनी नगरसेवकांना प्रशासकीय स्तरावर त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करणेही जमले नाही. परिणामी, त्यांच्या प्रभागातील विकासकामांबाबत त्यांचा क्रमांक मागेच राहिला. त्यातही काही महिला नगरसेवकांनी तर सभागृहात केवळ उपस्थिती दर्शविली आहे. सभागृहात विषय अथवा प्रस्ताव कुठलाही असो, त्यासाठी झालेल्या चर्चेत सुमारे २५ टक्के नगरसेवकांनी कायम सहभाग नोंदवत आपले अस्तित्व दाखवून दिले. पाच वर्षांच्या काळात सभागृहाने सिंहस्थ कुंभमेळ्यासह काही महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावले आहेत.