शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

आठ तासांत ३३३ अतिक्रमणे जमीनदोस्त

By admin | Updated: January 9, 2017 01:47 IST

भंगार बाजार : दोन दिवसांत ४२७ अनधिकृत गुदामांवर बुलडोझर; विना अडथळा पार पडली मोहिम

नाशिक : अवैध धंदे व गुन्हेगारीचे केंद्र बनत चाललेल्या सातपूर-अंबड लिंकरोडवरील चुंचाळे शिवारातील वादग्रस्त भंगार बाजार अतिक्रमण निर्मूलन मोहीम दुसऱ्या दिवशी कडेकोट पोलीस बंदोबस्तात युद्धपातळीवर महापालिकेने राबविली. आठ तासांत ३३३ अनधिकृत भंगारमालाची गुदामे व दुकानांवर बुलडोझर फिरविण्यात आला.सुमारे चाळीस एकर क्षेत्रावर व अडीच किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेला भंगार बाजार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने भुईसपाट करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारपासून (दि.७) महापालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या दिवशी ९४ अनधिकृत गुदामे पालिकेने उद्ध्वस्त केली तर रविवारी (दि.८) आठ तासांमध्ये ३३३ गुदामे भुईसपाट करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या मोहिमेप्रसंगी कुठलाही अडथळा पालिका कर्मचाऱ्यांना निर्माण झाला नाही. कडेकोट सशस्त्र पोलीस बंदोबस्त असल्यामुळे भंगार व्यावसायिकांनी मोहिमेला विरोध करण्याचे धाडस केले नाही. बारा पोकलॅन, २१ जेसीबी (बुलडोझर) यंत्रे सातपूर-अंबड लिंकरोडच्या दोन्ही बाजूस दिवसभर भंगार बाजारावर चालविण्यात आले. अनधिकृत भंगारमालाची गुदामे या यंत्रांद्वारे जमीनदोस्त करण्यात आली. यामध्ये पत्र्याच्या गुदामांचे मजबूत शेड, सीमेंट कॉँक्रीटची पक्की बांधकाम केलेली गुदामे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नेस्तनाबूत केली. पहिल्या दिवशी ९४ अतिक्रमणे हटविण्यात पालिकेला यश आले होते; मात्र दुसऱ्या दिवशी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे ३३३ अनधिकृत अतिक्रमणे हटविली. सोमवारी सकाळी पुन्हा मोहिम सुरू करण्यात येणार आहे.