लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.के.गावडे यांनी बुधवारी पदभार स्विकारला. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांनी त्यांच्याकडे पदभार सोपविला. नाशिक विभागीय उपायुक्त गावडे यांची दोन दिवसांपूर्वी शासनाने जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली केली होती. त्यांनी बुधवारी पदभार स्विकारला. यावेळी प्रभारी अधिकारी शेखर रौंदळ यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र बेडसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ व इतर विभागप्रमुख उपस्थित होते. गावडे यांनी सर्व अधिकाऱ्यांची ओळख करून घेतली. त्यानंतर मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले, येत्या काळात जिल्हा परिषदेच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. तळागाळातील खऱ्या लाभार्थींना त्यांचा लाभ मिळावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन देखील त्यांनी केले. याशिवाय विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सीईओ गावडे यांचे स्वागत व सत्कार केला.
जि.प.सीईओ गावडे यांनी घेतला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 12:39 IST