लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कांदा उत्पादकांना आलेले सुगीचे दिवस संपण्याची चिन्हे असून पुन्हा दर घसरून नुकसान होण्याची चिन्हे तयार झाली आहे. बाजार येणारा नवीन पावसाळी कांदा बाजारात सात ते दहा रुपये प्रतीक्विंटल दराने खरेदी होऊ लागल्याने शेतकऱ्यांची स्वप्ने धुळीस मिळून पुन्हा आर्थिक नुकसानीची कहाणी सुरू झाली आहे. नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागासह शहादा व तळोदा तालुक्यात यंदा पावसाळी कांदा लागवड करण्यात आली होती. साधारण २ हजार हेक्टरवरचा हा कांदा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथील बाजारात विक्रीसाठी शेतकरी पाठवतात. सहा महिन्यांपासून बाजारातील कांदा टंचाईमुळे ९० रुपयांच्या पुढे प्रतिकिलो कांदा विक्री होत होती. यातून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पैसे मिळून गेल्या काही वर्षात झालेल्या नुकसानीची भरपाई झाली होती. यातून पावसाळी कांदा लागवड वाढवत शेतकऱ्यांनी आर्थिक नियोजन केले होते. या नियोजनाला पहिला तडा सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने पहिला तडा दिल्याने शेतकऱ्यांचे २० ते ३०टक्के कांद्याचे नुकसान झाले होते. यातून शिल्लक असलेल्या कांद्याला जादा खर्च लावून शेतकरी त्याचे संगोपन करत होता. दरवाढ कायम असल्याने कांदा तारुन नेईल, अशी अपेक्षा असताना गेल्या आठवड्यापासून कांदा बाजारपेठेत दरांची घसरण सुरू झाली असून शनिवारी बाजार बंद होत असताना हेथेट १० रुपयांपर्यंत आले आहेत. नाशिक आणि इंदूरच्या बाजारात जाणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांनाही या दर घसरणीचा फटका बसला असून वाहतूक खर्च, मजुरी आणि इतर खर्चवजा जाता शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हावे लागण्याची चिन्हे आहेत. नंदुरबार तालुक्याच्या विविध भागातू दर रोज किमान १ हजार क्विंटलपेक्षा अधिक माल बाजारात रवाना होत आहे. परंतु त्या तुलनेत मिळणारे उत्पन्न हे खर्च भरून काढणारे नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत. येत्या काळात हे नुकसान वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहरी व निमशहरी भाग नंदुरबार बाजार समितीत दोन दिवसांपासून दरांमध्ये घसरण झाल्याने ५० क्विंटलपर्यंत कांदा आवक झाली आहे. यात दर मिळतील या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी छोट्या आकाराचा कांदाही बाजारात आणला होता या कांद्याला प्रतिक्विंटल ७०० अर्थात किलोमागे सात रूपये दर मिळाला आहे.
ग्रामीण भागबाजाराची वाहतूक, बाजार समितीची फी, आडते, हमाली असे करून शेतक-यांना दोन हजारपेक्षा अधिक लाभ झालेला नसल्याचे चित्र यावेळी दिसून आले. काही शेतकरी किरकोळ बाजारात कांदा विक्री करत असल्याचे रविवारी दिसून आले. सोमवारपासून दरात घसरण कायम असेल असा अंदाज आहे.
शेतक-यांचे नुकसानच : याबाबत आसाणे ता. नंदुरबार येथील शेतकरी चंद्रकांत पाटील यांना संपर्क केला असता, दरघसरणीमुळे शेतक-यांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.