शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

तीव्र चढ-उताराच्या रस्त्यावरुन पायपीट करीत आणावे लागते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 21:16 IST

हंसराज महाले । लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील धजापाणी हे गाव स्वातंत्र्यांच्या ७३ वर्षांनंतरही वंचित आहे. गावात ...

हंसराज महाले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा तालुक्यातील धजापाणी हे गाव स्वातंत्र्यांच्या ७३ वर्षांनंतरही वंचित आहे. गावात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसून त्या मिळविण्यासाठी ग्रामस्थांना संघर्ष करावा लागत आहे.सातपुड्याच्या कुशीत वसलेले धजापाणी हे गाव मालदा ग्रुपग्रामपंचायती अंतर्गत येते. गावात सुमारे १०० हून अधिक कुटूंब राहत असून येथे पाणी, वीज, रस्ते, शिक्षण, आरोग्य आदी मूलभूत सोयींचा अभाव आहे. मालदापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या धजापाणी गावाला जोडणारा पक्का रस्ता नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.  धजापाणी गावात पाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा हातपंप किंवा कुपनलिका नसून नदीतील पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी व इतर कामासाठी वापरावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. उन्हाळ्यात नदीचे पाणी आटत असल्याने झरा खोदून नागरिकांना पाणी उपलब्ध करून घ्यावे लागते. पाण्यासाठी महिलांना खोल उत्तरावे लागत असून पाण्याचा हंडा भरून उंच टेकड्यावर महिलांना चढावे लागत असल्याचे चित्र पहायला मिळते. एक-दोन विहीर असून दीड ते दोन किलोमीटरचे अंतर तीव्र चढ-उताराच्या टेकड्या पार करत पाणी आणावे लागते. आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या काळात पाण्यासाठी एवढी तारेवरची कसरत करावी लागत असल्याची येथील ग्रामस्थांची शोकांतिका आहे.वीज असून नसल्यासारखीधजापाणी येथे निम्म्याहून अधिक गावात वीज नसल्याचे चित्र आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी तर गावात वीजच नव्हती. ग्रामस्थांच्या व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याने गावात वीज पोहचविण्यात आली. परंतु त्याठिकाणी असणाऱ्या विविध पाड्यांवरील घरात वीज पोहोचली नसल्याने त्यांच्यासाठी वीज असून नसल्यासारखी आहे. काहींनी स्वतःचा खर्च करून लांब अंतरापर्यंत वायर टाकून वीज घरात आणली. परंतु ती अत्यंत खर्चिक बाब असल्याने प्रत्येकालाच ती परवडणारी नाही. केवळ गावात वीज पोहचविण्याचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले असल्याची ग्रामस्थांची व्यथा आहे. 

प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीचा अभावसातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात वसलेल्या अनेक दुर्गम-अतिदुर्गम भागात थेट नर्मदा काठापर्यंत अपवाद वगळता अनेक गावात रस्ते, वीज व आरोग्य पोहोचवण्यात आली आहे. मात्र बोरदपासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर वसलेल्या धजापाणी गावात अद्याप मूलभूत सोयीसुविधा पूर्णपणे उपलब्ध करून देण्यात प्रशासन व लोकप्रतिनिधी अपयशी ठरले असल्याचे चित्र आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे तर या गावात विकासाची गंगा पोहचू शकाला नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दुर्गम-अतिदुर्गम भागात सर्व प्रकारच्या मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शक्य   असून धजापाणी गावात पायाभूत सुविधांचा निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

गावात रस्ता, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सोयीसुविधाही उपलब्ध नाहीत. ग्रामस्थांना केवळ आतापर्यंत आश्वासनेच देण्यात आली. मात्र ती पूर्ण करण्यासाठी कोणाकडून प्रयत्न झाले नाहीत. गावात सोयीसुविधा उपलब्ध झाल्यास ग्रामस्थांच्या विकासाला चालना मिळेल.-गोरख पावरा, ग्रामस्थ, धजापाणी, ता.तळोदा.गावात सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. तांत्रिक व प्रशासकीय बाबींच्या पूर्तता करून गावाचा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे रस्त्याचे काम रखडले आहे.-करुणा पावरा, सरपंच, धजापाणी, ता.तळोदा.