शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

अन्य खतांची लिंकींग केले तरच युरिया मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गेल्या आठवड्यात तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू असून, खतासाठी सोमवारी विक्रेत्याकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गेल्या आठवड्यात तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू असून, खतासाठी सोमवारी विक्रेत्याकडे मोठ्या रांगा लागल्या होत्या. युरिया खताची कमतरता असून, अन्य खतांसोबत लिंकिंग केल्यानंतर युरिया खत विक्रीसाठी उपलब्ध केले जात आहे. युरिया खताचा पुरवठा शासनातर्फे मुबलक प्रमाणात व्हावा. त्याचप्रमाणे युरिया खता सोबत सुरू असलेली लिंकींग शासनाने बंद करावी अशी, मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.अनेक वर्षांनंतर तालुक्यात जून महिन्यात सरासरी २२१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला असला तरी युरिया खताच्या टंचाईमुळे हैराण झाला आहे. तालुक्यात दोन मुख्य विक्रेत्यांसह अनेक विक्रेते खताची विक्री करतात. दमदार पावसानंतर पेरणी सोबत युरिया खताचा वापर शेतकºयांकडून केला जातो तर ज्या बागायतदार शेतकºयांनी मे महिन्यात पेरणी केली आहे. अशांसाठी पिकांच्या जोमदार वाढीकरिता युरिया खत अत्यावश्यक असल्याने याची सर्वाधिक मागणी असते. परिणामी युरिया खत मिळवण्यासाठी शेतकºयांना अनेक दिव्य पार पाडावे लागते.शहरातील विक्रेत्यांकडे सोमवारी सकाळपासूनच युरिया खताच्या प्राप्तीसाठी विक्रेत्यांकडे शेतकºयांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. विक्रेत्यांमार्फत युरिया खताची विक्री केली जात असली तरी युरिया खतासोबत अन्य खताची लिंकिंग केल्यानंतरच विक्रेत्यांकडून शेतकºयांना युरिया खत उपलब्ध करून दिले जात होते. युरिया खताची टंचाई असल्याने हा सर्व प्रकार घडत असल्याची चर्चा शेतकºयांमध्ये होती. संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात युरियाची मागणी वाढल्याने लिंकिंगचा प्रकार केला जात असून, शेतकºयांच्या असहाय्यतेचा फायदा विक्रेते घेत असल्याची चर्चाही सुरू होती.खरीप हंगामापूर्वी युरियाची टंचाई जाणवू नये यासाठी केंद्र शासनामार्फत दरवर्षी मोठ्या प्रमाणात युरियाची आयात केली जात असते. मात्र यांना मार्च महिन्यापासून कोरोनाविषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने अपेक्षित युरिया खताची आयात झालेली नाही. त्याच प्रमाणे आपल्या देशात इतर खतांच्या तुलनेत युरिया खताचे उत्पादन करणाºया कारखान्यांची संख्या कमी असल्याने मागणी एवढा पुरवठा बाजारात केला जात नाही. त्याचप्रमाणे लॉकडाऊनमुळे खतनिर्मिती कारखान्यात काम करणारे कामगार आपल्या गावी गेल्याने कारखान्याची उत्पादन क्षमता कमी झाली आहे. परिणामी युरिया खताची टंचाई निर्माण झाली असून, भविष्यात परिस्थिती गंभीर होऊ शकते अशी, शक्यता शेतकºयांसह विक्रेत्यांमध्ये व्यक्त केली जात असल्याने युरिया खताच्या प्राप्तीसाठी शेतकºयांची धावपळ सुरू आहे. प्रति बॅग २६६ रूपये या दराने सोमवारी युरिया खताची विक्री झाली. मात्र युरिया खताच्या प्राप्तीसाठी सकाळपासून शेतकºयांच्या लांबच लांब रांगा दुकानासमोर होत्या. शासनाने युरिया खताचा मुबलक पुरवठा करावा त्याचप्रमाणे विक्रेत्यांकडून सुरू असलेला लिंकिंगचा प्रकार बंद करावा, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.युरिया एकूण मागणी ७४९२ झालेला पुरवठा ४९१८ मेट्रिक टनडी.ए.पी एकूण मागणी ८२४ झालेला पुरवठा ४७५ मेट्रिक टनएम.ओ.पी एकूण मागणी १५५२ झालेला पुरवठा १११९ मेट्रिक टनएस.एस.पी एकूण मागणी २७१७ झालेला पुरवठा ३३०५ मेट्रिक टनकॉम्प्लेक्स फर्टीलायझर एकूण मागणी ३०८६ झालेला पुरवठा २७७१ मेट्रिक टनशहादा तालुक्याची एकूण मागणी १५ हजार ६७१ झालेला पुरवठा १२ हजार ५८७ मेट्रिक टन