लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा तालुक्यातील कळंबू येथून सोमवारी पहाटेच्या सुमारास दोन दुचाकी चोरीला गेल्या. एकाच रात्रीत दोन दुचाकी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे.रविंद्र हिंमत माळी यांच्या मालकीची ३० हजार रूपये किमतीची व प्रविण बोरसे यांच्या मालकीची २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. याबाबत रविंद्र माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
कळंबू येथून दोन दुचाकींची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 12:38 IST