शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

सातपुड्यात गोगलगायींचे समद्ध विश्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 13:12 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘गोगल गाय आणि पोटात पाय’ अशी म्हण ऐकत, गोगल गायीविषयी विविध ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘गोगल गाय आणि पोटात पाय’ अशी म्हण ऐकत, गोगल गायीविषयी विविध गोष्टी, माहिती जाणून घेत, बालगिते ऐकत आपण मोठे झालो. एव्हढ्यावरच आपण या गरीब प्राण्याविषयी माहिती जाणून घेतो. परंतु हीच गोगलगाय पर्यावरण साखळीतील एक महत्वाचा किटकवर्गीय प्राणी आहे. खान्देशातून गेलेल्या आणि थेट गुजरात ते मध्यप्रदेश दरम्यान पसरलेल्या सातपुडा पर्वत हा गोगलगायींसाठी वरदान ठरला आहे. तब्बल ३०० पेक्षा अधीक प्रजाती या भागात आढळतात. अनेक प्रजाती तर केवळ सातपुड्यातच आहेत. जैव आणि अन्न साखळीतील महत्वाचा घटकावर आणखी संशोधन होणे आवश्यक आहे.पावसाळा सुरू झाला की रस्त्यांवर, दलदलीच्या ठिकाणी, ओलसर जागांवर गोगलगाय हळूहळू चालत, चिकट पदार्थ बाहेर फेकत जाणारी हमखास दिसते. बच्चे कंपनीचा हा कुतूहलचा विषय असतो. शंक असलेल्या आणि शंक नसलेल्या दोन प्रकारच्या गोगलगायी सर्वच भागात सहज दिसून येतात. पावसाळा संपला की आपणही मग गोगलगायीला आठ महिन्यांसाठी विसरून जातो. अशा या गोगलगायींवर तळोदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शशिकांत मगरे यांनी सखोल संशोधन केले आहे. सातपुडा पर्वत त्यांनी पिंजून काढत गोगलगायींचे अस्तित्व, त्यांच्या विविध आणि नवीन प्रजाती शोधून काढल्या आहेत. युजीसीने त्यांना त्यासाठी विशेष अर्थसहाय्य देखील केले आहे. जैव साखळीतील हा महत्वाचा घटक आहे. निरुपद्रवी म्हणून या प्राण्याकडे पाहिले जात होते. सातपुड्यातील गोगलगायींच्या विश्वाला वाचवून त्यात आणखी संशोधन करून जैवविविधतेचा हा ठेवा जपला जाणे आवश्यक आहे. यासाठी पर्यावण प्रेमी आणि जैवविविधतेत रस असणाऱ्यांनी पुढाकार घेणे अपेक्षीत आहे.गोगलगायीच्या देशभरात हजारो प्रजाती आढळतात. त्यापैकी विशेष ठरलेल्या १४८ प्रजाती या सातपुड्यात आढळून येतात. आतापर्यंत या भागात ३०० प्रजाती शोधून काढण्यात आल्या आहेत. गुजरात ते मध्यप्रदेश दरम्याच्या ९०० किलोमिटर भागातील सातपुड्यात या प्रजाती आढळतात. आता सरदार सरोवर प्रकल्पाच्या पाण्याच्या फुगवट्यामुळे बºयाच भागात दलदल व ओलावा राहत असल्यामुळे या प्रजातींना ते पोषकस वातावरण ठरत आहे. त्यामुळे आणखी संशोधन होणे आवश्यक आहे.सातपुड्यात गोगलगायींचे समृध्द विश्व आहे. आपण दहा वर्षांपूर्वीपासून या भागात गोगलगायींवर संशोधन सुरू केले. सुरूवातीला अभ्यास व आवड म्हणून शोध घेऊ लागलो. नंतर संशोधन सुरू केले. यासाठी युजीसीने प्रोजेक्ट दिले. त्यातून आपण ३००पेक्षा अधीक प्रजाती शोधून काढू शकलो. काही प्रजाती तर केवळ सातपुड्यातच आढळून येतात अशा आहेत. त्याबाबत अनेक अभ्यासक येथे संशोधन करण्यास उत्सूक आहेत.-प्राचार्य डॉ.शशिकांत मगरे,तळोदा महाविद्यालय.या आहेत प्रजाती...सातपुड्यात तसेच खान्देशात आढळणाºया प्रजातींमध्ये अचॅटिना फुलिका, सायकोफोरस इंडिकस, सायक्लोटॉपॉपिस सेमिस्ट्रीट, गलेसुला चेसोनी, मॅक्रोच्लेमिस मोहरा, मॅक्रोच्लेमिस टेनिकुला, ओपेस ग्रॅसिल, इन्सपायरा फेलॅकलेस, सेम्पेरुला बिर्मिनिका, ट्रॅचिया फोटेड, लिम्नेआ लुटेओला, लिम्नेआ अच्यूनाटा, लॅमेलीडेन्स मार्जिनलीस, कॉर्बिक्युला स्ट्राइटेला यासह इतर विविध प्रजातींचा समावेश आहे. या प्रजातींमध्ये जलचर आणि भूचर प्रकाराती गोगलगायींचा समावेश आहे. आता आणखी नवीन प्रजातींसाठी संशोधन सुरू आहे.दलदल व ओलाव्याच्या ठिकाणी...आपल्याला सहसा पावसाळ्यातच गोगलगाय दिसून येते. परंतु दलदल आणि ओलावा असलेल्या भागात गोगलगायीचे अस्त्वि कायम असते. सर्वसाधारण भागात गोगलगाय आठ महिने ही सुप्त अवस्थेत दगडाखाली, मातीखाली असते. ओलावा मिळताच ती पुन्हा सक्रीय होते. पाण्यातील गोगलगायींना संरक्षणासाठी पाठीवर शंख असतो. धोक्याच्या वेळी ती शंकात जाते. परंतु भूचर भागात दिसणारी गोगलगाय ही किटकाप्रमाणे असते. तिचे अस्तित्व आता शेत शिवारात देखील दिसू लागल्याने भाजीपाला पिकांना ती हानीकारक ठरत आहे.गोगलगायीचे आयुष्य सहासा सहा महिने ते अडीच वर्ष इतके असते. सातपुड्यात आढळून आलेल्या गोगलगायी या अगदी गहूच्या दाण्याच्या आकाराच्या ते दोन ते चार से.मी.आकाराच्या आहेत. त्यांचे जतन व संवर्धन करणे जैवविविधतेच्या दृष्टीने आवश्यक आहे.