शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
2
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
3
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
4
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
5
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
6
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
7
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
8
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
9
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
10
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
11
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
12
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
13
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
14
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
15
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
16
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
17
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
18
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
19
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
20
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”

कोंडाईबारीत खाजगी बस दरीत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 21:21 IST

पाच ठार : ३५ जखमी, एक मयत व १७ जखमी जळगाव जिल्ह्यातील

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या खामचौंदर शिवारातील पुलावरून खाजगी बस चाळीस फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात पाच जण ठार तर ३५ जण जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. अपघात इतका भीषण होता की या अपघातात खाजगी स्लीपर कोच बसचे अक्षरशः दोन तुकडे झाले. दुपारी १२वाजेपर्यंत अपघातातील मृतदेह काढण्याचे काम सुरू होते.मृतांमध्ये प्रतिभा मुकेश मरोही (३६) रा.सुरत, अमर अशोक बारी रा.पाचोरा, समशोद्दीन शेख युसूफ (४७) रा.भुसावळ, चालक वरदीचंद सोहनलाल मेघवाल (२४)रा.वेलदीया, जि.उदयपूर, सहचालक गणेश अंबादास नागरे (२३) रा.बुलढाणा यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये कन्हैयालाल बाबुलाल बागुल (३५)रा.केलपाडा, ता.साक्री, सैय्यद हारून सैय्यद समद (३४)रा.जळगाव, सैय्यद रियान सैय्यद हारून (१५)रा.जळगाव, आयुबखान साडेखान (५५) रा.जळगाव, समाधान सचीन पाटील (२८) रा.जळगाव, मुकेश रामचंद्र पाटील (३७)रा.सुरत, नासीरखान सुभानखान पठाण (२०) रा.सुरत, शांताराम किसन धनगर (३८)रा.भादली, ता.जळगाव, निलेश शांताराम धनगर (२२) रा.भादली, ता.जळगाव, फारूक शेख गनी (५२)रा.सुरत, सयैद जोया सैय्यद हारून (१८)रा.जळगाव, कुरसीनबी सानेखान (७०)रा.जळगाव, अपसाना सैय्यद (३२)रा.जळगाव, अख्तरबी अयुबखान (६०)जळगाव, रेखा समाधान पाटील (२६)रा.जळगाव, उषा शांताराम धनगर (४०)रा.भादली, ता.जळगाव, पुष्पाबाई विलास पाटील (५०)रा.सुरत, भाग्यश्री समाधान पाटील (२४)रा.जळगाव, प्रिया समाधान पाटील (नऊ वर्ष) रा.जळगाव, रोशनी अमर बारी (२४)रा.सुरत, जयेश भानुदास वाघोदे (२८)रा.जळगाव, उर्वशी विनोद पाटील (१०) सुरत, शोभा अनीलसिंग (४८)रा.सुरत, अनील सदानंदसिंग (५२)रा.सुरत, शेख नबीयाबी सालार (३५)रा.सुरत, शेख खलील शेख ईसा (५५)रा.सुरत, मोनिका पवन मारोटी (१७)रा.सुरत, श्रेयेश पवन पोगलीया (१३), मुकेश चंपकलाल जैन (४०)रा.सुरत, राजेश धरमदास मलानी (५०)रा.जळगाव, सिद्धार्थ संजय बिरारे (२०) रा.जळगाव, भलराम सिमनदास वलेचा (५२)रा.सुरत, विवेक राजेश मवानी (१९) रा.जळगाव, समाधान लालचंद पाटील (३७)रा.जळगाव. पोलीस सूत्रानुसार धुळे सुरत महामार्गावर रात्री जळगाव हुन सुरत कडे शुभम ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस (क्रमांक जी जे ०५ एव्ही ८५ ०१) ही भरधाव वेगाने धावतअसताना या बसच्या पुढे धावणारी किंग ट्रॅव्हलर कंपनीची खाजगी बस क्रमांक  (जि.जे १४ एक्स ३१११)  हिला कोंडाईबारी घाटातील खामचौंदर शिवारातील हजरत सय्यद अली रसूल बाबा यांच्या दर्ग्या जवळील पुलावर ओव्हरटेक करण्याच्या नादात उजव्या बाजूला जोरात धडक दिली. यावेळी वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने शुभम ट्रॅव्हल कंपनीची खाजगी बस अपघात करून व पुलाचे कठडे तोडून चाळीस फूट खाली उभी कोसळली.

  • या अपघातात समोर धावणाऱ्या खाजगी बसचा पत्रा कापला जाऊन त्यातील चार प्रवासी गंभीर जखमी झाले. तर पुलाखाली कोसळलेल्या बस मधील पाच प्रवासी जागीच ठार झाले तर इतर ३१ जण गंभीर जखमी झाले. एकुण ३५ जण जखमी झाले. 
  • हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त खासगी बसचे अक्षरशा वरचा भाग आणि खालचा भाग असे दोन तुकडे झाले या बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाश्यास अक्षरशः गॅस कटर च्या साह्याने पत्रा कापून त्याला बाहेर काढण्यात आले. हा प्रवासी सात तासापासून पाय अडकून पडलेल्या अवस्थेत होता. बाहेर काढल्या नंतर वैद्यकीय उपचारासाठी त्याला पाठवण्यात आले. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर वेदना सह प्राण वाचल्याचा समाधान दिसत होते.