शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
5
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
6
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
7
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
8
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
9
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
10
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
11
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
12
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
13
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
14
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
15
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
16
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
17
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
18
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
19
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
20
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)

दिव्यांग महिलेला विद्युत लोकपालांकडून न्याय

By admin | Updated: April 5, 2017 13:19 IST

दिव्यांग महिलेने डिमांड भरूनही एका वर्षानंतर वीज जोडणी देणा:या वीज कंपनीच्या अभियंत्याला विद्युत लोकपालने ‘दंड’ ठोठावला आहे.

नंदुरबार येथील दाम्पत्याचा लढा : वीज अधिका:याला दंड 
नंदुरबार,दि.5- वीज कनेक्शनसाठी दिव्यांग महिलेने डिमांड भरूनही एका वर्षानंतर वीज जोडणी देणा:या वीज कंपनीच्या अभियंत्याला विद्युत लोकपालने ‘दंड’ ठोठावला आहे. दिव्यांग महिलेला न्याय देत लोकपालांनी कंपनीला अधिका:यावर कारवाईचे आदेश दिले आहेत़ 
नंदुरबार येथील सरोज श्रीनिवास माहेश्वरी या दिव्यांग महिलेने 20 ऑगस्ट 2014 रोजी घरगुती वीज कनेक्शनसाठी अर्ज देऊन डिमांड रक्कम भरली होती़ हा भरणा केल्यानंतर संबधित महिलेला तात्काळ वीज जोडणी उपलब्ध करून देणे गरजेचे असतानाही कंपनीने तब्बल वर्षाच्या कालावधीनंतर वीज जोडणी केली़ वीज कनेक्शन देण्यास उशिर केला म्हणून सरोज माहेश्वरी यांनी विद्युत लोकपाल यांच्याकडे तक्रार दाखल केली होती़ या तक्रारीची दखल घेत, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे नंदुरबार विभागाचे तत्कालीन सहायक अभियंता यांना कामातील दिरंगाईबाबत दंड करून तो भरण्याचे आदेश दिले होत़े महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांच्याकडे केलेल्या या अर्जावर ग्राहक गा:हाणे विनियम 2006 यांच्या विनियम 17़2 अन्वये सुनावणी करण्यात आली होती़ वीज कंपनीच्या अधिका:यावर प्रथमच विद्युत लोकपालने कारवाई करत कंपनीच्या कारभारावरही ताशेरे ओढले आहेत़ 
 
लोकपाल यांनी ओढले कंपनीवर ताशेरे 
विद्युत लोकपालने सरोज माहेश्वरी यांच्या बाजूने निर्णय देताना तत्कालीन सहायक अभियंता हिंदोळे यांना चार हजार 100 रूपयांचा दंड केला आह़े मंचाच्या आदेशानुसार देयक दुरूस्ती दिरंगाईबाबत 400 तर सदोष मीटर वाचनापोटी 100 असे एकूण चार हजार 600 रूपये जमा करण्याचे आदेश संबधित अधिका:याला दिले होत़े  
हा निकाल देताना विद्युत लोकपाल यांनी विज कंपनी कार्यकारी अभियंता मंडळ कार्यालय नंदुरबार यांच्या कामकाजावर ताशेरे ओढत सुनावणीला कायम गैरहजर राहणारे तत्कालीन कार्याकारी अभियंता यांनी नियमांचा भंग केल्याचे म्हटले आह़े हा निकाल दिल्यानंतर संबधित तक्रारदार  यांना सूचनापत्राची प्रत देऊन त्याचा अभिप्राय हा विद्युत लोकपाल यांच्याकडे सोपवण्याचे आदेश देण्यात येऊन कंपनीने कारवाई न केल्याने लोकपाल यांनी कंपनीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यात आली़