प्रमुख मार्गदर्शक पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व नंदुरबार एलसीबीचे पंकज महाले, जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे सर्व अधिव्याख्याता व विषय सहाय्यक उपस्थित होते.
तज्ज्ञ मार्गदर्शन पंकज महाले यांनी सायबर क्राईम म्हणजे काय? सायबर क्राईमबाबत काय माहिती असली पाहिजे. आपला इ-मेल सुरक्षित ठेवणे, अकाैंट हॅक झाल्यास काय करावे? ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना काय काळजी घ्यावी. तंत्रज्ञानाचे फायदे अगणित आहे पण तोटेदेखील आहेत. आपल्या हातून माहिती तंत्रज्ञानाचा वापर करताना चुका होऊ नयेत म्हणून आजचे वेबिनार खूपच उपयुक्त आाहे असे मार्गदर्शकांनी सांगितले. आय. टी. विषय सहाय्यक प्रमोद बागले यांनीसुद्धा सायबर क्राईम आधुनिक काळातील एक जागतिक समस्या कशी बनली आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थी व पालक यांनी काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेला विषय सहाय्यक प्रकाश भामरे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेतील सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता प्रवीण चव्हाण, रमेश चौधरी तसेच अधिव्याख्याता, विषय सहाय्यक यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अधिव्याख्याता डॉ.वनमाला पवार तर आभार अधिव्याख्याता पंढरीनाथ जाधव यांनी मानले.