लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले मंदिरे भाविकांसाठी खुली करावीत या मागणीसाठी मंगळवारी भाजपने जिल्हाभरात विविध ठिकाणी आंदोलन केले.नंदुरबारात खासदारांच्याउपस्थितीत आंदोलनराज्य सरकारने राज्यातील मंदिरे उघडण्याऐवजी मदिरालये, रेस्टॉरंट्स, बार उघडले म्हणून राज्यातील जनतेने याचा तीव्र स्वरूपात धिक्कार करुन संतापही व्यक्त केला आहे. येत्या आठवड्याभरात राज्यातील मंदिरे उघडली नाहीत तर भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरेल आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल. याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकार व प्रशासनाची राहील, असा इशारा भाजपने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. राज्यातील लाखो भाविक मंदिरातील दर्शनासाठी भावूक झालेले आहेत. त्यांच्या भावनांची कदर सरकारने करावी आणि विनाविलंब योग्य ती काळजी घेत मंदिरे उघडी करावीत, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर खासदार डॅा.हीना गावीत, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, नरेंद्र माळी, माणिक माळी, निलेश माळी, चारुदत्त काळवणकर, लक्ष्मण माळी, हर्षल पाटील, संजय शाह, सपना अग्रवाल, संगीता सोनवणे आदींच्या सह्या आहेत.शहाद्यात लाक्षिणक उपोषणमहाराष्ट्रात धार्मिकस्थळे बंद व दारु दुकाने उघडी आहेत. आघाडी सरकार भक्तांच्या भावनांशी खेळत असून सरकारने धार्मिकस्थळे उघडावी, अशी मागणी करत भारतीय जनता पार्टी शहादा शहराच्या वतीने सिद्धीविनायक गणेश मंदिर येथे आघाडी सरकारच्या विरोधात लाक्षणिक उपोषण व घंटानांद आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने सर्व धार्मिकस्थळे बंद करण्यात आले आहेत. मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी होत असूनही राज्य सरकार मंदिरे उघडण्यासाठी पुढे येत नसल्याने भक्तांमध्ये असंतोष पसरला आहे. सरकारने भक्तांच्या भावना समजून त्वरित मंदिरे उघडावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी शहादा शहरकडून करण्यात आली आहे. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पाटील, शहर अध्यक्ष विनोद जैन, तालुका अध्यक्ष ईश्वर पाटील, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष राजीव देसाई, महामंत्री हितेंद्र वर्मा, उपाध्यक्ष पंकज सोनार, महामंत्री वैभव सोनार, सांस्कृतिक आघाडी जिल्हा अध्यक्ष निकेश राजपूत, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत वसावे, गौरव जैन, कामगार आघाडीचे जॅकी शिकलीकर, किसान मोर्चाचे अध्यक्ष श्रीराम पाटील, ईश्वर पाटील, कमलेश जागीड, आकाश निझरे, प्रशांत कुलकर्णी, सुनिल मटवाणी, तेजस सराफ, रुपेश पाटील, सुनील शर्मा, प्रतिभा पवार, भावना लोहार, रोहिणी भावसार, विविध आघाडी, मोर्चा चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान, युवा मोर्चा शहादा तालुक्याच्या वतीनेही शहरातील प्रेस मारुती मंदिरावर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, जिल्हा सरचिटणीस सचिन देवरे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रमाशंकर माळी, शहादा तालुकाध्यक्ष शरद पाटील, कार्तिक नाईक, मोहन मराठे, स्वप्नील पाटील, गौरव पटेल, सागर मराठे आदी उपस्थित होते.म्हसावद येथे निषेधशहादा तालुक्यातील म्हसावद येथे राज्य शासनाचा निषेध व्यक्त करीत आता तरी मंदिरे उघडी करा, अशी मागणी करण्यात आली. या वेळी भाजपचे कार्यकर्ते, भाविक व ग्रामस्थांनी येथील माँ अण्णपूर्णा माता मंदिरासमोर निषेध व्यक्त केला.
भाजपचे जिल्हाभरात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 12:51 IST