लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नगरपालिकेतर्फे जन्म आणि मृत्यूचे दाखले मिळवण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी निर्माण करण्यात आलेली एक खिडकी योजना फायदेशीर ठरत आहे. यामुळे नागरिकांना दोनच दिवसात संगणकीय दाखले मिळून सोय होत आहे.नंदुरबार नगरपालिकेत जन्म दाखल्यांबाबतची नेमकी स्थिती काय, याची पडताळणी लोकमतने केली होती. यांतर्गत पालिकेच्या सध्याच्या इमारतीत तळ मजल्यावर जन्म-मृत्यू दाखले देण्याची सोय करण्यात आली आहे. जास्त कागदपत्रांची मागणी न करता गरजेची कागदपत्रे घेत काही तासात दाखले दिले जात आहेत. ऑनलाइन नोंदण्या करून मिळणाऱ्या दाखल्यांमुळे नागरिकांच्या अडचणीही दूर होत असल्याचे तपासणीदरम्यान दिसून आले.
दोन दिवसात जन्म व मृत्यूचे दाखले देण्यात येत असल्याची बाब चांगली असली तरी याबाबत कर्मचा-यांची बैठक घेवून त्यांना सूचना करणार आहे. पालिकेकडून जन्म मृत्यू नोंदणी वाढवण्यासाठी जनजागृती करण्याचा उपक्रमही येत्या काळात हाती घेतला जाईल. - राजेंद्र शिंदेमुख्याधिकारी, नंदुरबार नगरपालिका
जन्म दाखल्यासाठी लाॅकडाऊन काळात अर्ज केला होता. पालिका प्रशासनाने वेगवान कामकाज करत दाखले मिळवून दिला होता. केवळ अर्ज केल्यानंतर दाखला प्राप्त झाला. एक खिडकीमुळे बऱ्याच अडचणी सुटल्या आहेत. यातून अडचणी दूर झाल्या. - सिद्धार्थ साळूंखेनागरिक, नंदुरबार.
जन्म दाखलाज्या रुग्णालयात बाळाचा जन्म झाला. तेथील प्रमाणपत्राच्या आधारे जन्म दाखला पालकांना वितरीत केला जातो. बऱ्याचवेळा पालक येण्यास उशीर करतात. अशा वेळी रुग्णालयाने दिलेल्या नोंदीनुसार दाखले तयार करून ठेवले जातात. पालक आल्यानंतर त्यांना दाखले देण्यास सुलभ होते. यासाठी १० रुपये आकारले जातात.
मृत्यू दाखलाएखाद्या व्यक्तीचा घरी तर एखाद्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाल्यास दोन्ही ठिकाणी डाॅक्टरांनी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार मृत्यूची नोंद केली जाते. एकखिडकीत नोंदीसह अर्ज केल्यानंतर दोन दिवसात मृत्यू दाखला देण्यात येतो. यासाठी प्रती प्रत १० रुपयांची फी आकारली जात असल्याचे या तपासणी दरम्यान दिसून आले.