लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवार ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता नंदुरबार नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे ई-भूमीपूजन आणि स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे ई-लोकार्पण करण्यात येणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री दादा भुसे, पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, खासदार संजय राऊत, डॉ.हिना गावीत, आमदार सुधीर तांबे, डॉ.विजयकुमार गावीत, शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी, मंजुळा गावीत, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.प्रशासकीय इमारतीसाठी ‘वैशिष्ट्यपूर्ण’ योजनेअंतर्गत नंदुरबार नगरपरिषदेस शासनाकडून सात कोटी रुपये वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. दोन वर्षात इमारतीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.नंदुरबार येथील नगरपरिषद हद्दीत अत्याधुनिक असा भव्य जलतरण तलाव उभारण्यात आला असून त्यासाठी शासनाकडून क्रिडा सुविधा निर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत ९० लक्ष प्राप्त झाले आहे. उर्वरीत खर्च १४ व्या वित्त आयोग व नगर परिषद फंडातून करण्यात आला आहे. जलतरण तलाव हा ऑलिंपीक आकाराचा बांधण्यात आलेला आहे. या ठिकाणी सुमारे ९०० प्रेक्षकांची बैठक व्यवस्था करण्यात आाली असून शालेय, जिल्हा पातळी, राज्य पातळी तसेच राष्ट्रीय पातळीवरचे स्पर्धा आयोजित करता येऊ शकणार असल्याची माहिती नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी दिली.
ई-भुमिपूजन सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 12:30 IST