शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

तळोदा येथील महाराजस्व अभियानात साडेपाच हजार दाखल्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 12:47 IST

तळोदा : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने येथील वामनराव बापूजी मंगल कार्यालयात विधी सेवा महाशिबिर घेण्यात आले. शनिवारी सकाळी नऊ वाजता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण योजना संलगA विविध शासकीय योजनांची लाभाथ्र्याना माहिती व लाभ जागीच देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या ...

तळोदा : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने येथील वामनराव बापूजी मंगल कार्यालयात विधी सेवा महाशिबिर घेण्यात आले. शनिवारी सकाळी नऊ वाजता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण योजना संलगA विविध शासकीय योजनांची लाभाथ्र्याना माहिती व लाभ जागीच देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या महाशिबिराचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.एम. बोर्डे यांनी केले.शिबिरास जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे संजय यादव, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश मेढे, आमदार उदेसिंग पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, मुख्याधिकारी जनार्दन पवार, तळोदा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती एम.जी. मोरे, वकील संघाचे सचिव अॅड.चंद्रकांत आगळे, अॅड.सचिन राणे, प्रभारी तहसीलदार रामजी राठोड, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे आदी उपस्थित होते.याप्रसंगी न्यायमूर्ती बोर्डे म्हणाले की, शासनाच्या सर्व सामान्यांसाठी अनेक योजना आहेत. पण त्या योजनांची माहितीच लोकांना मिळत नाही. त्यामुळे या योजनेचा निधी खर्च होत नाही व तो परत जातो. आदिवासी पाडय़ावर शेवटच्या ठिकाणी राहणारा जो गरीब माणूस आहे त्याच्या र्पयत ही माहिती पोहोचली पाहिजे. प्रशासनाच्या बरोबर राहुन त्यांच्या सहकार्याने हे काम आम्हाला करायचे आहे. पाडय़ावरच्या शेवटच्या आदिवासी माणसार्पयत पोहोचून काम केले पाहिजे. त्या माणसाच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत. प्रशासनाच्या बरोबर राहून लोकांना मदत करायची आहे. पाडय़ावरच्या आदिवासी भागातील शेवटच्या माणसाच्या चेह:यावर फुललेल हास्य पहाण हा या महाशिबिराचा उद्देश आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने सर्व सामान्य लोकांर्पयत शासनाच्या विविध योजना त्यांचे लाभ योग्य व गरजू लोकांर्पयत पोहोचविण्यासाठी प्रशासनाबरोबर न्यायालयाने सहभाग घेवून काम करण्याची ही संकल्पना असून, हे महाशिबिर नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा या गावात होत असल्याने शिबिराचे एक आगळे                 वेगळे महत्व असल्याचे न्याय.बोर्डे यांनी सांगितले. तसेच कायदेविषयक विधी सेवा प्राधिकरणाच्या माहिती पुस्तिकेची प्रकाशन करण्यात           आले.या वेळी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले की, लाभाथ्र्याना सर्व योजनांची माहिती एकाच छताखाली मिळावी यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. आभार जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश अभय एस.वाघवसे यांनी मानले.कार्यक्रमास राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष निखीलकुमार तुरखिया, वतनकुमार मगरे, औरंगाबादचे सरकारी वकील अमरसिंग गिरासे, नंदुरबार जिल्हा सरकारी वकील सुशिल पंडित, अॅड.चंद्रशेखर पवार, अॅड.किरण बैसाणे, अॅड.शैलेष कापुरे, अॅड.संजय पुराणीक, अॅड.महेबुब मन्सुरी, अॅड.एन.एस. शेख, अॅड.इम्रान पिंजारी, अॅड.महेबुब मन्सुरी, तालुका गट वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्रकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, यादव भदाणे यांच्यासह पोलीस, महसूल, पालिका, कृषी, वन विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आरोग्य व इतर विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.