शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

साखर झोपेत असतांनाच काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 12:37 IST

नथ्थू जाधव। लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : पहाटे दोन, अडीच वाजेची साखर झोपेत सर्व प्रवासी होते. अचानक काहीतर ठोकले ...

नथ्थू जाधव।लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : पहाटे दोन, अडीच वाजेची साखर झोपेत सर्व प्रवासी होते. अचानक काहीतर ठोकले गेल्याचा आवाज झाला. काहींना जाग आली तर बस हेलकावे घेत खाली कोसळली. त्यानंतर काही क्षणातच कपाळ, हातपाय यांना प्रचंड वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर कळले की अपघात झाला असून कुठेतरी खोल दरीत आपण बससह पडलो आहोत. आजूबाजू किर्र अंधार होता. महामार्ग रहदारीचा असल्यामुळे लागलीच वरून मदतीसाठी स्टार्च आणि वाहनाचे दिवे चमकत होते. त्यामुळे लवकर मदत मिळेल या अपेक्षत मदतीसाठी धावाधाव करीत होतो. परंतु दुर्गम दरी असल्यामुळे मदत पोहचण्यात काही काळ गेला. ही आपबीती होती कोडाईबारी घाटातील जखमींची.   जळगावकडून सुरतकडे जाणाऱ्या खाजगी बसला बुधवारी पहाटे कोंडाईबारी घाटात अपघात झाला. अपघात एवढा भिषण होता की बसचे दोन तुकडे झाले. शिवाय दरी खोल आणि दुर्गम असल्यामुळे बचाव कार्यात अडथळे आले. परिणामी शेवटचा मृतदेह काढण्यात दुपारचे १२ वाजले होते. शुभम ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस (क्रमांक जी जे ०५ एव्ही ८५ ०१) ही नेहमीप्रमाणे सुरत जाण्यासाठी मंगळवारी रात्री जळगावहून निघाली. धुळेमार्गे बस साक्री पास केल्यानंतर कोंडाईचारी घाटात पहाटे दोन वाजेच्या सुमारास आली. घाटाच्या उताराच्या भागात ओव्हरटेक करतांना पुढे चालणाऱ्या दुसऱ्या बसला मागून धडक दिली. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आही बस खोल दरीत कोसळली. बचावासाठी आरडाओरडबस खोल दरीत कोसळली, परंतु त्याआधी दुसऱ्या बसला धडक दिल्याने ही बस कोसळल्याचे लक्षात आले. परिणामी लागलीच बचाव कार्यासाठी मदत मागता आली. परंतु खोल दरी आणि अंधार यामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. दुसरीकडे जखमी झालेले बसमध्येच विव्हळत होते. पोलीस, आरोग्य यंत्रणा आणि परिसरातील गावातील लोकं धावून आल्यावर मदत कार्याला वेग      आला. या अपघाताची माहिती अपघात स्थळापासून जवळच असलेल्या मोरकरंजा येथील खानापूर ग्रामपंचायतचे सरपंच सुनील गावित यांना मिळाली. त्यांनी तात्काळ विसरवाडी व महामार्ग पोलीस मदत केंद्रास कळवले. अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस व महामार्ग पोलिस मदत केंद्रावरील पोलीस तसेच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अपघातग्रस्तांना मदत कार्य सुरू केले.   सर्व अपघातग्रस्तांना विसरवाडी, नवापूर, साक्री व नंदुरबार येथून  रुग्णवाहिका मागून त्यांना तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद वळवी व परिचारिका वर्ग तसेच कर्मचारी यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर रुग्णांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारार्थ पाठवण्यात आले. तसेच काही रुग्णांनी धुळे व सुरत येथे हलवण्यात आले.घटनास्थळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधीक्षक सुनील साळुंखे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर एम काझी ,  विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक संदीप पाटील ,पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे व ५० पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी तळ ठोकून होते. यावेळी पोलीस दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात  आल्याचे पोलीस अधीक्षक पंडित यांनी दिली.या अपघातामुळे पहाटे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग पोलिसांनी ती सुरळीत केली व बचाव कार्याला वेग दिला. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात किंग ट्रॅव्हल्स या बसचा चालक गणेश रघुनाथ बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम ट्रॅव्हल्स चे चालक वरदीचंद सोहनलाल मेघवाल त्याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व व पोलीस कर्मचारी करीत आहेत. 

आठ तास मृतदेहांवर होता लटकून...शेवटच्या जखमीला बाहेर काढण्यास दुपारचे १२ वाजले होते. याच जखमीच्या खाली दोन मृतदेह लटकलेले होते. ही बाब जखमीला कळू नये यासाठी बचाव पथकाने आवश्यक ती खबरदारी घेतली. ते पाहून किंवा ऐकुण त्याचा धसका त्याने घेऊ नये हा त्यामागचा उद्देश होता. अखेर त्याला बाहेर काढल्यावर दोन्ही मृतदेहही कटरने बसचा पत्रा कापून बाहेर काढले. या सर्व घडामोडी होत असतांना पोलीस अधीक्षक, अपर अधीक्षक तेथे थांबून होते. जखमींना तातडीने उपचार मिळावे यासाठी घटनास्थळी देखील आरोग्य पथक तैणात करण्यात आले होते.