शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात तीन वर्षात 25 टक्के घरकुल पुर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 12:43 IST

चाजक प्रक्रिया व अटी : प्रधानमंत्री आवास योजनेचे काम जिल्ह्यात संथ

नंदुरबार : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात तीन वर्षात 88 हजार 400 जणांनी प्रस्ताव दिले. पैकी 38 हजार 574 उद्दीष्टापैकी ऑगस्ट अखेर आठ हजार 17 घरकुले पुर्ण झाले आहेत. त्यात सर्वाधिक नवापूर तालुक्यात दोन हजार 110 तर सर्वात कमी धडगाव तालुक्यात 455 घरकुलांचा समावेश आहे. केवळ 25 टक्के घरकुले पुर्ण झाली. दरम्यान, चालू आर्थिक वर्षात केंद्रशासनाकडून याद्यांनुसार लाभार्थीच्या खात्यावर पैसे जमा करण्याच्या पद्धतीत बदल झाल्याने योजनेला फारशी गती मिळाली नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.पूर्वी इंदिरा आवास योजना म्हणून ओळखली जाणारी ही योजना 2015 पासून पंतप्रधान आवास योजना म्हणून पुढे आली. त्यातही गेल्या तीन वर्षात अनेक बदल करण्यात आले. लाभार्थ्ीची निवड प्रक्रिया जीओ टॅगींग आणि लाभाथ्र्याच्या खात्यावर थेट रक्कम जमा करण्याची ही प्रक्रिया अनेक क्लिष्ट प्रकारातून जात आहे. त्यामुळे घरकुल पुर्ण होणे आणि ते प्रत्यक्षात लाभाथ्र्याच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया अतिशय वेळखाऊ झाली आहे. दुसरीकडे शासन टार्गेट पुर्ण करण्यासाठी यंत्रणेवर दबाव आणत आहे तर दुसरीकडे यंत्रणेच्या अडचणी सुटत नसल्यामुळे समस्या उभ्या ठाकत आहेत. परिणामी गेल्या तीन वर्षात 38 हजार 574 घरकुलांचे उद्दीष्ट असतांना केवळ आठ हजार 17 घरकुलेच प्रत्यक्षात पुर्ण झाल्याचे चित्र आहे.खात्यावरील रक्कमेचा अडचणीयोजना सुरू झाल्यानंतर केंद्र शासनाकडून मंजूर झालेल्या याद्यांमधील लाभार्थीच्या खात्यावर तीन टप्प्यात 1 लाख 20 हजार रुपयांचे वितरण करण्यात येत होत़े पहिल्या टप्प्यात 30, दुस:या टप्प्यात 60 तर तिस:या टप्प्यात 30 हजार रुपयांचे वितरण करण्यात येत़े यात 2017-18 मध्ये बदल करण्यात येऊन प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी केंद्रीय स्तराऐवजी राज्यस्तरावरून वितरित करण्याचे नियोजन करण्यात आल़े यात पाच टप्प्यात लाभार्थीच्या बँक खात्यात पैसे टाकण्याचे धोरण स्विकारण्यात आल़े यानुसार पहिल्या तीन टप्प्यात 30, चौथ्या टप्प्यात 20 तर शेवटच्या टप्प्यात 10 हजार रुपयांचे वितरण करण्याचे आदेश काढण्यात आल़े यामुळे घरकूल बांधकाम करणा:या लाभार्थीना अडचणींचा सामना करावा लागून घरबांधणीच्या कामांवर परिणाम झाला आह़े जिओ टॅगींगपंचायत समितीस्तरावर घर मंजूर करण्यासाठी जिओ टॅगिंग कराव लागत़े जिओ टॅगिंग केल्याशिवाय घरे मंजूर करता येत नाही, आचारसंहिता आणि जिओ टँगिगचे लांबलेले कामकाज यातून गेल्या अडचणी आल्या आहेत़ त्या सोडविण्यासाठी आणि कामकाज सुरळीत   करण्यासाठी उपायोजना करण्यात आल्या आहेत. परंतु नंदुरबार जिल्ह्याची भौगोलिक रचना, दळणवळणाच्या सुविधा या बाबी लक्षात घेता जिओ टॅगींगलाही मर्यादा येत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात घरकुलांचे प्रस्ताव आलेल्यांपैकी जवळपास 50 हजार ठिकाणी जिओ टॅगींग करण्यात आले. त्यात अक्कलकुवा तालुक्यात 19 हजार 867 प्रस्तावांपैकी 15 हजार 673 ठिकाणी जिओ टॅगींग करण्यात आले. धडगाव तालुक्यात 15 हजार 670 प्रस्तांवापैकी सहा हजार 919, नंदुरबार तालुक्यात आठ हजार 450 पैकी तीन हजार 335, नवापूर तालुक्यात 17 हजार 409 पैकी आठ हजार 809, शहादा तालुक्यात 17 हजार 131 प्रस्तावांपैकी सहा हजार 925 तर तळोदा तालुक्यात नऊ हजार 873 प्रस्तावांपैकी तीन हजार 775 ठिकाणी जिओ टॅगींग करण्यात आले.यादी बाद..इंदिरा आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात 2014 र्पयत 78 हजार लाभार्थीच्या याद्या पूर्ण होत्या़ या याद्यांनुसार 60 हजार लाभार्थींची घरकुलांची गरज पूर्ण झाली होती़ तर उर्वरित 18 हजार लाभार्थीना गेल्या तीन वर्षात घरकुल देणे प्रस्तावित असताना, या याद्या बाद ठरवत 2011च्या सव्रेक्षणानुसार 1 लाख 9 हजार 368 लाभार्थीचा समावेश असलेल्या याद्या ग्राह्य धरून प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली़ ही योजनेला 3 वर्ष पूर्ण होऊनही केवळ 25 टक्के घरकुलांचे वाटप झाल्याचे स्पष्ट झाल़े