लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेला ऑक्सीजन प्लॅन्टचे काम पुर्ण झाले असून सोमवारपासून तो कार्यान्वीत होणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून चाचणी स्वरूपात ९४ ते ९५ टक्के शुद्ध ऑक्सीजन निर्मीती सुरू झाली आहे. या प्लॅन्टचे औपचारिक उद्घाटन सोमवार, ९ रोजी सायंकाळी चार वाजता पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. कोरोनाची रुग्णसंख्या जास्त होती त्यावेळी जिल्हा रुग्णालयात ऑक्सीजनचा तुटवडा होता. शिवाय राज्यभर देखील तुटवडा होता. परिणामी मागणीप्रमाणे पुरवठा होत नव्हता. ही बाब लक्षात घेता स्थानिक स्तरावरच ऑक्सीजन प्लॅन्ट तयार करावा यासाठी चर्चा करण्यात आली. कोरोनानंतरच्या काळात देखील ऑक्सीजन सिलिंडर स्थानिक ठिकाणीच उपलब्ध व्हावे यासाठी लागलीच या प्लॅन्टला मंजुरी देण्यात आली. अत्याधुनिक मशिनरींनी तयार होणाऱ्या या प्लॅन्टची उभारणी आता पुर्ण झाली आहे. त्याचे औपचारिक उद्घाटन सोमवार, ९ रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. दिवसाला १०० सिलिंडरएका दिवसात १०० जम्बो सिलिंडर ऑक्सीजन निर्मीतीची क्षमता या प्लॅन्टची आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाला पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन पुरवठा होणार आहे. नंदुरबारच्या या प्लॅन्टमध्ये सर्व अत्याधुनिक मशिनरी बसविण्यात आली आहे. हवेतूनच ऑक्सीजन घेऊन त्यातून अनावश्यक घटक बाहेर काढून शुद्ध ऑक्सीजन वेगळा केला जाणार आहे. दररोज किमान १०० जम्बो सिलिंडर ऑक्सीजन निर्मिती या ठिकाणी करण्याचे नियोजन आहे.चाचणी झाली यशस्वीया प्लॅन्टमध्ये गेल्या आठ दिवसांपासून चाचणी करण्यात येत आहे. जास्तीत जास्त शुद्ध आऑक्सीजन निर्मिती होईल यासाठी प्रयत्न झाला. त्यानुसार शुक्रवारपर्यंत निर्मीत झालेल्या आऑक्सीजनमध्ये जवळपास ९४ टक्के ऑक्सीजन मिळत होता. सोमवारपासून पुर्ण क्षमतेेने हा प्लॅन्ट सुरू होणार आहे. गरज भागवली जाईलसद्याच्या स्थितीत जिल्हा रुग्णालयाला दिवसाला कोविड व नाॉन कोविड मिळून जवळपास १००ते १२५ सिलिंडर लागतात. कोरोनाचे रुग्ण संख्या जास्त होत्या त्यावेळी ही संख्या दीडशे ते २०० च्या घरात होती. कोविड संपला तरी या लागणारी सिलिंडरची गरज ही येथेच पुर्ण होणार आहे. याशिवाय धुळे किंवा जळगाव येथून आणावे लागणारे सिलिंडर, त्याचा वाहतूक खर्च, वेळ हे सर्व वाचणार आहे. सोमवारी उद्घाटनया प्लॅन्टचे औपचारिक उद्घाटन सोमवार, ९ रोजी दुपारी चार वाजता होणार आहे. यावेळी मान्यवर उपस्थित राहणार असून त्यांना यावेळी चाचणी देखील देखील दाखविली जाणार आहे.
भविष्यातही सोयीचे... जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमधील ऑक्सीजनची गरज या प्लॅन्टमधून पुर्ण होणार आहे. त्यामुळे भविष्यात देखील हा प्लॅन्ट सोयीचा ठरणार आहे. जिल्हाबाहेरील एजन्सीला या प्लॅन्टच्या उभारणीचे काम देण्यात आले होते.