शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

माहूरमध्ये मांडूळतस्कर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 23:43 IST

माहूर वनपरिक्षेत्रात लाखो रुपये किमतीचे मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या सहा पुरुष व एक महिलेला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन मांडूळ जप्त करण्यात आले.

ठळक मुद्देएका महिलेसह सहा पुरुष घेतले ताब्यात, मांडुळाची लाखोंची किंमत

श्रीक्षेत्र माहूर : माहूर वनपरिक्षेत्रात लाखो रुपये किमतीचे मांडूळ जातीच्या सापाचीतस्करी करणाऱ्या सहा पुरुष व एक महिलेला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन मांडूळ जप्त करण्यात आले.३० एप्रिल रोजी माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे पाटील यांना मिळालेल्या माहितीवरुन सापळा रचण्यात आला. पथकाने २ मांडूळ प्रजातीचे साप हस्तगत केले. यावेळी एक महिला व ६ पुरुषांना ताब्यात घेण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मांडूळाचे वजन ५५० ग्रॅम व १.८० किलोग्रॅम आहे. आंतरराष्टÑीय बाजारात या मांडूळाची किंमत लाखो रुपये आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांकडून तीन मोटारसायकली, सात मोबाईल हस्तगत करण्यात आले. आशा विजय चव्हाण (रा.निंगनूर ता.उमरखेड) सुरेश शंकर राठोड (रा.मदनापूर), मोतीसिंग प्रकाश तगरे (रा.परोटी), सुंदरसिंग गणपत पेळे (रा.परोटी), नागनाथ जालम पडवळ (रा.नागसवाडी), पांडुरंग शिवाजी जगताप (रा.नागसवाडी) लक्ष्मण माधव भरकड (रा.कमठाला ता.किनवट) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. या सर्वांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ मधील कलम ९,३९,४८ अ व ५१ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.वनपथकात वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे पाटील,मांडवीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तायनाक, फिरते पथक किनवटचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शेळके यांचा समावेश आहे. यात वनपाल सोनकांबळे, वनपाल संतवाले, वनरक्षक फोले, श्रीमती माहुरे घोरबांड, कोटकर, कराळे, गेडाम, राठोड, मुसांडे वानोळे, शिंदे बरले धोंडगे, क्षीरसागर भूतनार आठवले यांनीही महत्त्वाची कामगिरी बजावली.दरम्यान, तस्करामध्ये विदर्भ व मराठवाड्यातील जंगलाशेजारील गावच्या आरोपींचा समावेश असल्याने या प्रकरणाचा संबंध शेजारच्या तेलंगणा राज्याशी असल्याची शंका व्यक्त होत आहे. गुप्तधन शोधण्यासाठी मांडूळ हे उपयोगी जीव असल्याची लोकवंदता आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसsnakeसापSmugglingतस्करी