शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १ लाख २१ हजार ६०२ शेतकऱ्यांना विमा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:17 IST

जिल्ह्यातील मागील वर्षी खरीप हंगामात विमा योजनेत ज्वारी, तूर, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग या पिकांसाठी एकूण ९ लाख ५५ ...

जिल्ह्यातील मागील वर्षी खरीप हंगामात विमा योजनेत ज्वारी, तूर, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग या पिकांसाठी एकूण ९ लाख ५५ हजार ८०० शेतकऱ्यांनी ४४ कोटी ६८ लाख रुपयांचा विमा हप्ता इफको टोकियो विमा कंपनीकडे भरला होता. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले होते. यावेळी कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या ६९ हजार ६६४ शेतकऱ्यांना ६५ कोटी ५० लाख रुपयांची भरपाई मिळाली होती. काढणी पश्चात नुकसान झालेल्या १२ हजार ३६९ शेतकऱ्यांना १० कोटी ४३ लाख असे एकूण ७५ कोटी ८४ लाखांची भरपाई मिळाली होती. उत्पन्न आधारित विमा नुकसान भरपाईमध्ये जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी किनवट व लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. तालुक्यात कापणी प्रयोगाच्या आधारे उत्पादकता चांगली आली. त्यामुळे किनवट व लोहा तालुक्यांना उत्पन्न आधारित नुकसान भरपाई मिळत नसल्याचे सांगण्यात आले.

चौकट-

पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०२० मधील उत्पन्न आधारित नुकसान झालेल्या ३० हजार २६९ शेतकऱ्यांना २१ कोटी ९७ लाख ५१ हजार रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. यापूर्वी स्थानिक नैसर्गिक आपत्ती तसेच काढणी पश्चात नुकसान झालेल्या ८२ हजार ३३३ शेतकऱ्यांना ७५ कोटी ८४ लाखांचा विमा मिळाला होता.

चौकट-

खरीप हंगाम २०२० मध्ये पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९ लाख ५५ हजार ८०० शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन सहा पिकांसाठी ४४ हजार ४४ कोटी ६८ लाख २२ हजार ४५८ रुपयांचा हप्त भरला होता. राज्य शासनाचा हिस्सा २८४ कोटी ४३ लाख ८३ हजार ७१३ व केंद्र शासनाचा हिस्सा २८४ कोटी ४३ लाख ८३ हजार २१७ असा एकूण ६१३ कोटी ५५ लाख ६९ हजार ८८४ रुपये कंपनीकडे प्रीमिअम जमा झाला होता. यातून जिल्ह्याला एकूण ९७ कोटी ९१ लाख ३५ हजार रुपये विमा भरपाई मिळाली.