लोकमत न्यूज नेटवर्कपार्डी : अर्धापूर तालुक्यातील शेती शंभर टक्के सिंचनाखाली असून येथे भाऊराव चव्हाण साखर उद्योगाचे तीन युनिट कार्यरत आहेत. या कारखान्याच्या भरवशावर बहुसंख्य शेतकऱ्यांनी ऊस आणि काही प्रमाणात हळदीची लागवड केली आहे. या ऊस आणि हळद या दोन्हीही बागायती पिकाला 'हुमणी' रोगाचा विळखा पडला आहे.ऐन हिवाळ्यातसुद्धा शेतातील उभा ऊस वाळून गेला आहे. तर हळदीचे पीक करपायला लागले आहे. या उद्भवलेल्या परिस्थितीने शेतकरी चिंतेत सापडला आहे.शासनाच्या पाहणी अहवालात अर्धापूर तालुक्यात सुकाळ दाखविला असला तरी येथील शेतकºयांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यात आता केळी, ऊस व हाळदीला हुमणी रोगाचा विळखा पडला असून ऐन हिवाळ्यात उसाचे पाचट होत आहे. तर हळदीच्या वाढीवर परिणाम झाला आहे. या हुमणीचा प्रतिबंध करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. हुमणी आळीच्या प्रादुर्भावामुळे पीक उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.परिसरात केळीचे रोपे रोगग्रस्त झाल्यामुळे रोपांची मर वाढली आहे. तसेच हळद करपायला लागली आहे. या सर्व प्रकारामुळे परिसरातील शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.यंदा इसापूर धरणाचे पाणी सिंचनासाठी मिळणार असल्यामुळे केळीची लागवड करण्यात आली आहे. ऊत्तीसंवर्धित (टिश्यू कल्चर) केळीच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे; पण सध्या या केळीच्या रोपांना हुमणीचा विळखा पडला आहे. त्यामुळे रोपांची मर वाढली आहे.अर्धापूर तालुक्यात केळी, हळद व उसाचे लागवडीक्षेत्र जास्त आहे. एकेकाळी केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या केळीच्या पट्ट््यात सध्या हळदीचे क्षेत्र पाच पटीने वाढले आहे. तसेच उसाचेही लागवडक्षेत्र जास्त आहे. पण मागील महिनाभरापासून येथील ऊस, हळद व केळी पिकावर हुमणी रोग पडला असून शेतातील पिकाचे उत्पन्न घटले आहे. तर गुलाबी बोंडअळीने कापसाच्या पहिल्या वेचणीतच कापसाच्या पराट्या झाल्या आहेत. अशा दुष्काळी परिस्थितीत हळद व ऊसाला ‘हुमणी’ लागली असल्याने शेतकरी शेतातील उभा ऊस चारा म्हणून विक्री करीत आहेत.शेतकºयांना पुन्हा रोपांची लागवड करावी लागत आहे. तर शेतकरी या हुमणीचा प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाय करीत आहेत. खरिपाच्या हंगामाने दगा दिल्यानंतर शेतक-यांची सारी भिस्त रबी हंगामावर होती ; पण परतीचा पाऊस न पडल्यामुळे रबीच्या हंगामाचीही आशा धूसर होत आहे. अशा सर्व बिकट परिस्थितीचा सामना करताना शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहे.
ऊस, हळदीला ‘हुमणी’ चा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:28 IST
अर्धापूर तालुक्यातील शेती शंभर टक्के सिंचनाखाली असून येथे भाऊराव चव्हाण साखर उद्योगाचे तीन युनिट कार्यरत आहेत. या कारखान्याच्या भरवशावर बहुसंख्य शेतकऱ्यांनी ऊस आणि काही प्रमाणात हळदीची लागवड केली आहे.
ऊस, हळदीला ‘हुमणी’ चा विळखा
ठळक मुद्देअर्धापूर तालुका हिवाळ्यातच वाळला ऊस, अळीच्या प्रादुर्भावामुळे वजनात घट