जिल्ह्यात आतापर्यंत २२ हजार ८८७ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ३० हजार ५१५ फ्रंटलाईनच्या वर्कर्सला लसीचा पहिला डोस दिला आहे. आता दुसऱ्या लसींसाठी त्यांना प्रतिक्षेत रहावे लागत आहे. जिल्ह्याला आतापर्यंत कोविशिल्ड आिण कोव्हॅक्सीन या दोन्ही लसींचे ४ लाख ३१ हजार ३७० डोस प्राप्त झाले आहेत. त्यातील ३ लाख ९१ हजार डोसचा वापर करण्यात आला आहे. यासर्व लसीकरण प्रक्रियेत जिल्ह्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या केवळ ६५ हजार इतकीच आहे. प्रारंभी लसीकरणाच्या मोहिमेत खाजगी रूग्णालयांनाही लस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र आता खाजगी रूग्णालयांना लस उपलब्ध होत नाही.
लसीकरणाच्या नियोजनाचे प्रयत्न - डॉ. शिंदे
जिल्ह्यात प्रत्येक नागरिकांची लसीकरण करण्याचे प्रयत्न केले जात आहे. गावपातळीवर प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे. मात्र लसींचा अपुरा पुरवठा होत असल्याने अडथळे येत आहेत. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्स यांनाही वेळेत लस देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केल्यानंतर लसीकरणासाठीचा मेसेज आल्यानंतरच केंद्रावर जावे असे आवाहनही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.