शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

भूलतज्ज्ञाचीच पडली भूल

By admin | Updated: February 3, 2015 17:11 IST

कोणतीही शस्त्रक्रिया म्हटले की भूलतज्ज्ञाची गरज भासतेच., परंतु येथील शासकीय आयुर्वेद रुग्णालयातील भूलतज्ज्ञाचे पद गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त आहे. याबाबत प्रशासनाने संचालकांना लेखीही कळविले.

 भाग-१ पंचनामा आयुर्वेदिकचा

शिवराज बिचेवार ल्ल /नांदेडकोणतीही शस्त्रक्रिया म्हटले की भूलतज्ज्ञाची गरज भासतेच., परंतु येथील शासकीय आयुर्वेद रुग्णालयातील भूलतज्ज्ञाचे पद गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त आहे. याबाबत प्रशासनाने संचालकांना लेखीही कळविले. परंतु संचालकांनाच या भूलतज्ज्ञाची भूल पडल्यामुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय होत असून अनेक महत्वाच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.राज्यातील अतिशय महत्वाचे म्हणून नांदेडच्या आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालयाची ओळख आहे. याच ठिकाणी राज्यातील एकमेव रसशाळाही आहे, परंतु संचालक कार्यालयाकडून नेहमीच नांदेडला दिली जाणारी सापत्न वागणूक यामुळे आजघडीला ही रसशाळा रसातळाला जाण्याच्या मार्गावर आहे. तीच अवस्था रुग्णालयाचीही झाली आहे. येथे अनेक पदे रिक्त असतानाही ती भरण्याचे गांभीर्य ना प्रशासनाला आहे ना संचालकांना. त्यातच शस्त्रक्रिया विभागासाठी अतिशय महत्वाचे असलेले भूलतज्ज्ञाचे पद येथे दोन महिन्यांपासून रिक्त आहे. यापूर्वीचे भूलतज्ज्ञ दोन महिन्योपूर्वीच सेवानवृत्त झाले. त्यापूर्वी दोन महिने अगोदर प्रशासनाने हे पद भरण्याबाबत संचालकांशी पत्रव्यवहार केला होता. परंतु चार महिने उलटले तरी, संचालक कार्यालयाला भूलतज्ज्ञाची आठवण झालीच नाही. / नांदेडच्या आयुर्वेदीक महाविद्यालय व रुग्णालयावर वरिष्ठ कार्यालयाकडून नेहमी सापत्न वागणूक दिली जाते. येथील पदांची मंजुरी असो किंवा रसशाळेचा विषय वरिष्ठ कार्यालयाकडून नेहमी त्यांना केराची टोपली दाखविली जाते. त्याचा फटका राज्यभरात नावाजलेल्या या महाविद्यालय अन् रुग्णालयाला बसत आहे. याबाबत प्रभारी अधिष्ठाता डॉ.अन्नापुरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, भूलतज्ज्ञाचे पद भरण्याबाबत संचालक कार्यालयाला पत्र पाठविण्यात आले आहे. त्याचबरोबर तात्पुरत्या स्वरुपात एखाद्या कंत्राटी भूलतज्ज्ञाची नेमणुक करण्याबाबतही मार्गदर्शन मागविले होते. त्यात संचालक कार्यालयाकडून कायम किंवा कंत्राटी तज्ज्ञ नेमण्याची प्रक्रिया सुरु आहे.

भूलतज्ज्ञासाठी मोजावे लागतात हजार रुपयेआयुर्वेद रुग्णालयात भूलतज्ज्ञ नसल्यामुळे खाजगी सेवेतील भूलतज्ज्ञाला शस्त्रक्रियेच्या वेळी येथे पाचारण करावे लागते. बाहेरुन येणारे हे भूलतज्ज्ञ एकावेळी एका रुग्णाकडून जवळपास एक हजार रुपये फीस घेतात. अशाप्रकारे त्या दिवशी होणार्‍या सर्व शस्त्रक्रियांसाठी त्याच भूलतज्ज्ञाकडून काम भागविले जाते. अशाप्रकारे या भूलतज्ज्ञांना हजारो रुपये मिळत असले तरी, त्यामध्ये गरीब रुग्णांची मात्र मोठय़ा प्रमाणात लूट सुरु आहे. पैसे नसल्यामुळे आलेल्यांना इथे तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून सापत्न वागणूक महिन्यात होतात ४0 रुग्णांवर शस्त्रक्रियाशासकीय आयुर्वेद रुग्णालयात आठवड्यात शल्य विभाग, प्रसूती, शालाक्य या विभागांच्या प्रत्येकी दोन दिवस शस्त्रक्रिया असतात. अशा मिळून एकूण महिन्याकाठी येथे किमान ४0 महत्वाच्या शस्त्रक्रिया पार पडतात. या सर्वच शस्त्रक्रियांसाठी भूलतज्ज्ञाची आवश्यकता असतेच. त्यामुळे नाईलाजाने खाजगी सेवा देणार्‍या भूलतज्ज्ञाला पाचारण केले जाते अन् त्यानंतरच शस्त्रक्रिया उरकली जाते. रुग्णालयात भूलतज्ज्ञ असताना त्यावेळी किमान महिन्याकाठी ६0 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया होत असल्याचे आयुर्वेदिक प्रशासनाचेच म्हणणे आहे. आता मात्र त्यामध्ये मोठी घट झाली आहे. याबाबत विचारणा केली असता, ज्यांच्याजवळ भूलतज्ज्ञाला देण्यासाठी पैसे नसतात. त्यांच्या शस्त्रक्रिया पैशाची व्यवस्था होईपर्यंत पुढे ढकलल्या जातात. तर काही वेळेला पैसे नसल्यामुळे रुग्णच येथून आपल्या आजारासह काढता पाय घेतात.