शेतकरी संघटनेची बैठक
नांदेड, येथील नवा मोंढा भागातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात जिल्हा शेतकरी संघटनेची बैठक शुक्रवार १ जानेवारी रोजी आयोजित केली आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे उंचेगावकर यांनी केले आहे. सध्या संपूर्ण भारतात शेतकरी हाच विषय चर्चिला जात असून, देशाची राजधानी दिल्ली येथे शेतकरी आंदोलन हा चर्चेचा विषय बनला आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्रातील सरकार विविध शेतकरी संघटनांशी चर्चा करत आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातून नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र गुणवंत पाटील हंगरगेकर हे दिल्ली येथील चर्चासत्राला उपस्थित राहिले होते. या बैठकीत गुणवंत पाटील मार्गदर्शन करतील, तसेच ९ जानेवारी रोजी हदगाव येथे आयोजित शेतकरी संघटनेने शेतकरी जागर मेळाव्यासंदर्भात चर्चा होणार आहे. बैठकीत गुणवंत पाटील हंगरगेकर, ॲड. धोंडिबा पाटील पवार, जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे हे मार्गदर्शन करतील.