बदलापूरच्या 'त्या' शाळेत मुलींची अश्लील फिल्म बनवणे, अवयव विक्रीचे उद्योग: नाना पटोले

By शिवराज बिचेवार | Updated: November 8, 2024 11:29 IST2024-11-08T11:19:57+5:302024-11-08T11:29:22+5:30

आरएसएसशी संबंधित शाळा असल्यानेच सरकारने या शाळेवर मेहेरबानी दाखवल्याचा आरोपही पटोले यांनी केला आहे.

Badlapur's 'that' school making pornographic film, organ selling industry: Nana Patole | बदलापूरच्या 'त्या' शाळेत मुलींची अश्लील फिल्म बनवणे, अवयव विक्रीचे उद्योग: नाना पटोले

बदलापूरच्या 'त्या' शाळेत मुलींची अश्लील फिल्म बनवणे, अवयव विक्रीचे उद्योग: नाना पटोले

नांदेड: बदलापूर येथील शाळेमध्ये लहान मुलीवर अत्याचारची घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. ही शाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी संबंधित असून या शाळेत लहान मुलींचे अश्लील चित्रफिती तयार करणे, अवयव विक्री करणे अशा पद्धतीचे उद्योग सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नांदेडमध्ये एका जाहीर सभेत केला आहे. 

गुरुवारी रात्री वाजेगाव येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले, आरएसएसशी संबंधित शाळा असल्यानेच सरकारने या शाळेवर मेहेरबानी दाखवल्याचा आरोपही पटोले यांनी केला आहे.

अशोक चव्हाण यांच्यावर टीका 
 "अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातून दोनदा मुख्यमंत्रीपद, अनेक वर्षे मंत्रीपद भोगले पण काँग्रेस पक्ष अडचणीत असताना ते काँग्रेसला सोडून भाजपात गेले. ज्या काँग्रेस पक्षाने त्यांना मोठे केले त्यालाच आज ते शिव्या देत आहेत. अशोक चव्हाण भाजपामध्ये असते तर त्यांचा राजकीय उदय झाला नसता. दोनदा मुख्यमंत्री झाले पण त्यांनी स्वतःचे घर भरण्याचेच काम केले. सत्तेचा वापर करून दहा पिढ्यांचा उद्धार केला आणि जेलमध्ये जावे लागेल या भितीने अशोक चव्हाण भाजपात गेले," असा घणाघात नाना पटोले यांनी केला.

Web Title: Badlapur's 'that' school making pornographic film, organ selling industry: Nana Patole