जिल्ह्यात प्रतिदिन १५ हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे. या लसीकरणाचा वेग वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहे. लसीकरणासाठी ०.५ एमएलची एडी सिरींज वापरली जात आहे. प्रत्येक व्यक्तीस एक सिरींज वापरली जाणे आवश्यक आहे. तशी ती वापरली जाते. मध्यंतरी एडी सिरींजची कमतरता भासल्याने लसीकरण थांबल्याचे प्रकारही घडले होते. ही बाब पाहता आता खासगी स्तरावरही ०.५, ०.२ एमएलच्या सिरींजची खरेदी करता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाचा वेग कमी होणार नाही, हे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
काय आहे एडी सिरिंज?
एडी सिरिंज म्हणजे ॲटो डिसेबल सिरिंज. या सिरिंजमध्ये केवळ एक वेळाच लस देता येते. त्यानंतर ही सुई ऑटोमॅटिक लॉक होते. या सुईने पुन्हा दुसऱ्या वेळेस लसीकरण करता येत नाही. त्यामुळे रोगांचा फैलाव रोखला जातो.
वेस्टेजची नाही चिंता
जिल्ह्यात लसींच्या वेस्टेजचे प्रमाणत अत्यल्प आहे. आतापर्यंतच्या नोंदीनुसार कोव्हॅक्सिनच्या वेस्टेजचे प्रमाण शून्य टक्के आहे तर कोविशिल्डच्या वेस्टेजचे प्रमाणही जेमतेम ०.१ टक्का आहे. त्यामुळे वेस्टेजचे प्रमाण नाहीच.
२ सीसी सिरिंज
कशी असते?
n२ सीसी सिरिंज म्हणजे २ एम.एल. लस घेता येईल, अशी सिरिंज. या सिरिंजमध्ये जेवढी लस हवी आहे, तेवढी घेऊन समोरच्या व्यक्तीला लस देण्याची सुविधा असते. खुल्या बाजारपेठेत या सिरिंज उपलब्ध आहेत.
nलसीकरणासाठी आता ०.५ एम.एल., ०.२ एम.एल.ची सिरींजही वापरात घेता येणार आहे. स्थानिक स्तरावर ही सिरींज खरेदी करता येईल. एडी सिरींजची कमतरता पाहता हा निर्णय घेतला.
जिल्ह्यात एडी सिरींजच्या मोठ्या प्रमाणात पुरवठा झाला आहे. काही लसीकरण केंद्रावर एडी सिरींजची कमतरता भासत असल्याने स्थानिक स्तरावर सिरींज खरेदीची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सिरींजअभावी लसीकरण थांबणार नाही. हे निश्चित.
-डॉ. विद्या झिने, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी