काटाेल : वेगात असलेला ट्रॅक्टर राेडलगत मातीच्या ढिगाऱ्यावरून गेल्याने कामगार खाली काेसळला. त्याच्या डाेक्यावरून ट्राॅलीचे चाक गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील घरतवाडा शिवारात बुधवारी (२५) दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास घडली.
विशा गांगुर्डे असे मृत कामगाराचे नाव आहे. ताे एमएच-३१/झेड-८६९३ क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर बसून जात हाेता. घरतवाडा शिवारात चालक सावन अशाेक बाेके (२५, रा. गाेंडी माेहगाव, ता. काटाेल) याचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर राेडलगतच्या मातीच्या ढिगाऱ्यावर गेल्याने उसळला. त्यामुळे विशाल खाली काेसळताच सावरण्यापूर्वीच त्याच्या डाेक्यावरून ट्राॅलीचे चाक गेले. त्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक शाही करीत आहेत.