शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय लाभ देणार कधी?

By admin | Updated: August 21, 2015 03:21 IST

बुटीबोरी इंडस्ट्रीज परिसरात २०० खाटांचे हॉस्पिटल सुरू करण्याचा सरकारने निर्णय घेतला असला तरीही सध्या डॉक्टर्स आणि आधुनिक उपकरणांच्या टंचाईमुळे कामगार...

बुटीबोरी इंडस्ट्रीज परिसर : सेवा अद्ययावत करण्याची कामगारांची मागणीनागपूर : बुटीबोरी इंडस्ट्रीज परिसरात २०० खाटांचे हॉस्पिटल सुरू करण्याचा सरकारने निर्णय घेतला असला तरीही सध्या डॉक्टर्स आणि आधुनिक उपकरणांच्या टंचाईमुळे कामगार वैद्यकीय लाभापासून वंचित आहेत. नवीन हॉस्पिटल सुरू होण्यास ३ ते ४ वर्षे लागतील, तोपर्यंत अस्तित्वातील सेवा अद्ययावत करा, अशी कामगारांची मागणी आहे. डॉक्टर्स व तज्ज्ञांची ८० टक्के पदे रिक्तबुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे सहसचिव प्रदीप राऊत यांनी सांगितले की, बुटीबोरी इंडस्ट्रीयल परिसरातील एखाद्या कारखान्यात कामगाराचा अपघात झाल्यास त्याच्यावर प्राथमिक उपचार बुटीबोरी येथील डिस्पेन्सरीत करण्यात येतो. त्यानंतर त्या कामगाराला उपचारासाठी ईएसआयसीएसच्या सोमवारी पेठ येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात येते. विदर्भातील कामगारांसाठी एकमेव असलेल्या या हॉस्पिटलची स्थिती अतिशय दयनीय आहे. येथे उपचार होण्याऐवजी कामगारांना मरण यातनाच जास्त मिळतात. नर्सेस, बॉय आदींसह तज्ज्ञ डॉक्टर्स आणि प्रशासकीय अधिकारी अशा एकूण २५० पदांची गरज आहे. पण सध्या ५१ पदे भरली असून १९९ पदे अर्थात ८० टक्के जागा रिक्त आहेत. याशिवाय प्राथमिक उपचारांसाठी बुटीबोरी, हिंगणा रोड, वानाडोंगरी, हिंगणा रोड-वाडी आणि पाचपावली येथील डिस्पेन्सरीत डॉक्टरांसह ४० जणांची गरज आहे. पण तिथेही केवळ ८ जागा भरल्या असून ३२ जागा रिक्त आहेत.विदर्भात १.६२ लाख कामगारांची नोंदणीविदर्भातील १.६२ कामगार ईएसआयसीकडे नोंदणीबद्ध आहेत. या कामगारांचे महिन्याकाठी ८ कोटी रुपये ईएसआयसीकडे अर्थात केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडे जमा होतात. केंद्र राज्याला पैसा देते. या रुपयांतून कामगारांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत, अशी अपेक्षा आहे. पण राज्य सरकारतर्फे संचालित ईएसआयएसमध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स आणि उपकरणांअभावी कामगारांना वैद्यकीय सेवा मिळत नाहीत. खासगी हॉस्पिटलमध्ये गेल्यास तिथे उपचाराचे अव्वाच्या सव्वा रुपये आकारले जातात. कर्मचाऱ्यांचा फंड त्यांच्या उपचारासाठीच खर्च व्हावा, अशी मागणी राऊत यांनी केली. उत्पादनावर परिणामएखाद्या कारखान्यात अपघात झाल्यास त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. ईएसआयसी आणि ईएसआयएसच्या तंट्यात कामगार वैद्यकीय सेवेपासून वंचित आहेत. सोमवारी पेठ येथील हॉस्पिटल केंद्र सरकारला हस्तांतरित करण्याची मागणी आहे. मुंबईतील राज्याच्या ईएसआयएस हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सुविधा आहेत तर दिल्लीत केंद्र सरकारचे आधुनिक हॉस्पिटल आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ येथे कामगारांच्या उपचारासाठी राज्यांचे हॉस्पिटल आहेत, मग नागपुरात का नाही, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.एकही अ‍ॅम्ब्युलन्स नाहीबुटीबोरी इंडस्ट्रीयल परिसरात एक अ‍ॅम्ब्युलन्स मिळावी, अशी आमची मागणी आहे. पण ही मागणी राज्याने धुडकावून लावल्याने विदर्भाला काहीच मिळत नाही, असा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. कामगारांसाठी २०० खाटांचे हॉस्पिटल होईल तेव्हा होईल, पण सध्या कामगारांना उपचारासाठी अस्तित्वातील डिस्पेन्सरीज आणि हॉस्पिटल्स तातडीने अद्ययावत करावे, अशी मागणी केईसी इंटरनॅशनलचे एचआर प्रमुख प्रदीप राऊत यांनी लोकमतशी बोलताना केली. (प्रतिनिधी)२००४ पासून स्थिती दयनीयईएसआयसी आणि ईएसआयएस या दोघांच्या चढाओढीत विदर्भातील अपघातग्रस्त कामगारांना यातना मिळत आहेत. विदर्भावर हा अन्याय २००४ सालापासून होत आहे. या प्रश्नी राजकीय नेत्यांनीही चुप्पी साधली आहे. वैद्यकीय सेवा देणाऱ्या सोमवारी पेठेतील हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांअभावी अपघातगस्त कामगारांना मेडिट्रीना, शुअरटेक किंवा वोक्हार्ट या करारबद्ध केलेल्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केले जात होते. पण या हॉस्पिटल्सनेही उपचाराचे पैसे मिळत नसल्यामुळे कामगारांवर उपचार करण्यास नकार दिला आहे. बुटीबोरी येथील डिस्पेन्सरी दिवसा सहा तास खुली असते. पण कारखान्यांमध्ये अपघात सायंकाळी ५ ते पहाटे या वेळात घडतात. पेशंट उपचारासाठी एकीकडून दुसरीकडे फिरतो. त्यातच कामगारांना उपचार न मिळाल्याने जीव गेल्याच्या घटना घडल्याचा आरोप प्रदीप राऊत यांनी केला.