शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

योजनेने बदलणार गावांचे ‘लूक’

By admin | Updated: July 6, 2014 00:52 IST

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत २०१० ते १४ या कालावधीत तिसऱ्या वर्षात जिल्ह्यातील २६९ ग्रामपंचायती पात्र ठरलेल्या आहेत. या योजनेत मिळणाऱ्या निधीतून गावात उच्च प्रतिच्या भौतिक

पर्यावरण समृद्ध ग्राम योजना : २६९ गावात उच्च प्रतिच्या भौतिक सुविधांची निर्मितीनागपूर : पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत २०१० ते १४ या कालावधीत तिसऱ्या वर्षात जिल्ह्यातील २६९ ग्रामपंचायती पात्र ठरलेल्या आहेत. या योजनेत मिळणाऱ्या निधीतून गावात उच्च प्रतिच्या भौतिक सुविधांच्या निर्मितीला गती मिळाली आहे. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना ग्रामीण भागाच्या विकासाचा पाया आहे. यात टप्प्या टप्प्याने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचा समावेश करण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या वर्षात ७५३, दुसऱ्या वर्षात ६६१ ग्रामपंचायतींचा या योजनेत समावेश करण्यात आला होता. प्रत्येक वर्षासाठी निवडीचे व पात्रतेचे वेगवेगळे निकष ठरविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव भांडारकर यांनी दिली.या योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या १० हजाराहून अधिक लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीला तीन वर्षात ३० लाखांचे अनुदान दिले जाते. तर तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या ग्राम पंचायतीला ३६ लाखांचे अनुदान दिले जाते. ७ ते १० हजारापर्यंत लोकसंख्येच्या गावाला २४ लाख, ५ ते ७ हजार लोकसंख्येला १५ लाख, २ ते ५ हजारापर्यंत १२ लाख, १ हजार ते २ हजारापर्यंत ९ तर १ हजारापर्यंत लोकसंख्येच्या गावाला ६ लाखांचे अनुदान दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून गावातील विकासाला चालना मिळाली आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निकष पूर्ण केले जातात. परंतु तिसऱ्या टप्प्यातील निकष अनेक ग्रामपंचायती पूर्ण करीत नाही. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरण्यासाठी ग्रामपंचायतींनी प्रयत्न करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)तिसऱ्या टप्प्यातील निकषग्रामपंचायत १०० टक्के हागणदारीमुक्त झाली असावी. निर्मलग्राम पुरस्कारासाठी राज्याने शिफारस केलेली असावी. थकबाकीसह ९० टक्के करवसुली, कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यावर बंदी, मूर्ती विसर्जन करताना प्रदूषणाच्या दृष्टीने उपाययोजना करणे, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान व यशवंत पंचायत राज अभियानात प्रत्येकी किमान ६० टक्के गुण, अपारंपरिक उर्जेचे १०० टक्के स्ट्रीट लाईट, घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्यापासून १०० टक्के खत निर्मिती व सांडपाणी व्यवस्थापनाचे ७५ टक्के काम होणे गरजेचे आहे. उद्दिष्टेपर्यावरण समतोल राखण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा विकास व लोकसहभाग, इको व्हिलेजची संकल्पना राबविणे, राज्य शासनाच्या विविध योजनांची सांगड घालून योजनांचा समन्वय करणे, मोठ्या ग्रा.पं.च्या पर्यावरण विकास आराखडा व ग्राम विकास आराखडा तयार करून शहराच्या तोडीच्या सुविधा निर्माण करणे.शहरी तोडीच्या सुविधायोजनेतून पर्यावरण संवर्धन जतन व संरक्षण करून समृद्ध व संपन्न गावाची निर्मिती करणे, गावात उच्च प्रतिच्या भौतिक व मूलभूत सुविधांची निर्मिती करणे, मूल्यवर्धित स्थानिक रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती करणे, जल, जमीन, जंगल, हवा व वनस्पती यांचे योग्य व्यवस्थापन करून भौतिक सुविधांची निर्मिती पर्यावण संतुलन राखून करणे त्याद्वारे ग्रामस्थांच्या जीवनमान दर्जा सुधारणे, ग्राम पर्यावरणविषयक आराखडा तयार करून शहरी तोडीच्या सुविधा निर्माण करण्याचा हेतू या योजनेच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती वासुदेव भांडारकर यांनी दिली.