शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमवीर अमित यांना आॅरेंजसिटीचा मानाचा मुजरा

By admin | Updated: July 5, 2017 01:55 IST

दिग्गज सायकलिस्टला खुणावणाऱ्या परंतु सायकलपटूंचे लक्ष्य असलेल्या ‘रेस अक्रॉस अमेरिका (रॅम) पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करीत देशातील पहिले सायकलपटू होण्याचा विक्रम नोंदविणारे....

‘आयर्न मॅन’चे आगमन : शहरातील २५० सायकलिस्टकडून जल्लोषात स्वागतलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिग्गज सायकलिस्टला खुणावणाऱ्या परंतु सायकलपटूंचे लक्ष्य असलेल्या ‘रेस अक्रॉस अमेरिका (रॅम) पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करीत देशातील पहिले सायकलपटू होण्याचा विक्रम नोंदविणारे डॉ. अमित समर्थ यांचे मंगळवारी आॅरेंज सिटीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.पाच हजार किलोमीटरची आव्हानात्मक शर्यत १२ दिवसांत पूर्ण करून डॉ. अमित हे सोमवारी मध्यरात्री मायदेशी परतले. आज सकाळी आगमनानंतर काही तासात नागपुरातील २५० हून अधिक सायकलिस्टनी त्यांच्या सन्मानार्थ शहरातील प्रमुख रस्त्यांवरून सायकल रॅली काढत या कामगिरीबद्दल मानाचा मुजरा केला.शहराच्या विविध भागात पहाटेच्यावेळी सायकलपटू फिटनेसकरता सायकलिंग करताना दिसतात. मंगळवारचा दिवस सायकलिस्टकरिता अविस्मरणीय ठरला. सर्वांचा आवडता खेळाडू, शहराचे नाव विक्रमांच्या यादीत नोंदवणाऱ्या ‘आयर्न मॅन’ डॉ. अमित यांच्या स्वागताकरिता चाहत्यांनी आॅरेंज सिटी चौकात गर्दी केली होती. डॉ. अमित यांच्या चाहत्यांनी एका खुल्या जीपमधून रॅली काढण्याआधी जोरदार टाळ्या वाजवूत स्वागत केले, अनेकांनी ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या. रॅली आठरस्ता चौक, शंकरनगर, वेस्ट हायकोर्ट रोड, जपानी गार्डन, फुटाळा तलाव परिसर मार्गे अमरावती मार्गावरील भास्कर सभागृहात दाखल झाली. याठिकाणी डॉ. अमित यांचा भव्य सत्कार करण्यात आला.सारथी बनले सचिन...यावेळी डॉ. समर्थ यांच्यासोबत संपूर्ण रॅमदरम्यान नेव्हीगेटरची भूमिका बजावणारे सचिन पालेवार यांच्या चेहऱ्यावरही आनंद झळकत होता. मला सुरुवातीपासूनच माहिती होते रॅमसारखी अत्यंत खडतर मानली शर्यत अमितच पूर्ण करू शकतो. त्यामुळे आपण सतत त्याने यासाठी प्रयत्न करावा असे सांगत होतो. केवळ रॅमदरम्यानच नव्हे तर सचिन, या शर्यतीकरिता असलेल्या पुणे ते गोवा या नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या पात्रतेच्या शर्यतीतही डॉ. अमित यांच्यासोबत होते. रॅमदरम्यान अमित दिवसाला केवळ २ ते ३ तासांची विश्रांती घेत असत. पॅसिफिक ते अ‍ॅटलांटिक कोस्ट या प्रवासादरम्यान बरेचदा सायकल चालवताना जेवण घ्यावे लागे, असा अनुभवही पालेवार यांनी सांगितला. अर्थात मुकुल समर्थ, जितेंद्र नायक आणि रेणुका नायक हे अन्य सहकारी देखील आज अमितच्या यशाचे कौतुक करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.हे सांघिक यश : डॉ. अमितसत्काराने भारावलेले डॉ. अमित उत्तर देताना म्हणाले,‘ हे केवळ माझे एकट्याचे यश नाही. २० लोकांची चमू माझ्यावर सतत लक्ष ठेवून होती, लक्ष्य निर्धारित वेळेत कसे गाठता येईल यासाठी प्रयत्न करीत होतो. त्यामुळे हे सांघिक यश आहे.’ रॅममध्ये डॉ. अमित समर्थ यांनी पाच हजार किलोमीटरचे अंतर ११ दिवस २१ तास ११ मिनिटात पूर्ण केले. याच शर्यतीत दुसरे भारतीय व दुसऱ्यांदा सहभागी होत असलेले नाशिकचे श्रीनिवास गोकुलनाथ यांनीही ही स्पर्धा पूर्ण केली. शिवगर्जनातर्फे ढोलताशांचा गजर...सत्कारानंतर शिवगर्जना ढोलपथकाने डॉ. समर्थ यांच्या सन्मानार्थ केलेल्या वादनाला शेकडो नागरिकांनी चांगलीच दाद दिली. सत्कारादरम्यान डॉ. अमित यांचे आई-वडील, पत्नी, सहा वर्षीय मुलगा अयान उपस्थित होते.