शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील किल्ले स्फूर्ती केंद्रे

By admin | Updated: October 12, 2015 02:51 IST

विदर्भात ३२ किल्ले आहेत. त्यापैकी तीन घनदाट जंगलात आहे. या किल्ल्यांमुळे विदर्भाची वेगळीच प्रतिभा निर्माण झाली आहे.

‘गड संवर्धन’ कार्यशाळा : श्रीपाद चितळे यांचे प्रतिपादननागपूर : विदर्भात ३२ किल्ले आहेत. त्यापैकी तीन घनदाट जंगलात आहे. या किल्ल्यांमुळे विदर्भाची वेगळीच प्रतिभा निर्माण झाली आहे. विदर्भातील किल्ले ऐतिहासिक ठेवाच नव्हे, तर नवीन पिढीसाठी स्फूर्ती केंद्रे ठरत असल्याचे प्रतिपादन पुरातत्त्व अभ्यासक श्रीपाद चितळे यांनी केले. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्त्व व वस्तू संग्रहालय संचालनालय आणि गड संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी एक दिवसीय ‘गड संवर्धन’ कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. धरमपेठ येथील वनामतीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यशाळेचे उद्घाटन राजे मुधोजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला अतिथी म्हणून डॉ. भा. रा. अंधारे, बी. एस. गजभिये, गड संवर्धन समितीचे प्रमुख मार्गदर्शक पांडुरंग बलकवडे, पुणे येथील डेक्कन कॉलेजचे संशोधन सहायक डॉ. सचिन जोशी, गड संवर्धन समितीचे सदस्य प्रफुल्ल माटेगांवकर व डॉ. विराग सोनटक्के उपस्थित होते. यावेळी राजे मुधोजी भोसले यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणातून ऐतिहासिक वास्तुंमध्ये केवळ किल्लेच नाही, तर अनेक प्राचीन मंदिरे व वास्तुंचाही समावेश होत असल्याचे सांगितले. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन करण्याची गरज आहे. परंतु अलीकडेच भंडारा जिल्ह्यातील एका ऐतिहासिक किल्ल्याची विक्री करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. एखाद्या ऐतिहासिक वास्तुचा अशाप्रकारे खरेदी-विक्री व्यवहार कसा होऊ शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करू न, राज्य शासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली. शिवाय संबंधित गावकऱ्यांनीसुद्धा पुढाकार घेउन,अशा ऐतिहासिक वास्तुंची खरेदी-विक्री रोखली पाहिजे,असे त्यांनी आवाहन केले. भा. रा. अंधारे यांनी विदर्भातील किल्ल्यांची माहिती देताना, त्यांच्या संवर्धनाची गरज असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील किल्ले केवळ पर्यटन स्थळे नाहीत, तर एक गौरवशाली ऐतिहासिक व सामाजिक वारसा असल्याचे ते म्हणाले. या कार्यशाळेत पुरातत्त्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शेकडो विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत डॉ. सचिन जोशी, डॉ. अभिजित दांडेकर व डॉ. रघुनाथ बोरकर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विराग सोनटक्के यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)