नागपूर : देशाचे उपराष्ट्रपती मो. हमीद अन्सारी शुक्रवारी एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या ५५ व्या स्थापना दिन समारंभास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे सायंकाळी ५ ते ६ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असून अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे असतील. दुपारी ४.४० वाजता उपराष्ट्रपतींचे नागपूरला आगमन होईल. कार्यक्रमानंतर सायंकाळी ६.१५ वाजता ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाहून नवी दिल्लीकडे प्रयाण करतील.
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आज शहरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2016 03:06 IST