शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

वासवानीच्या एन्ट्रीला ब्रेक

By admin | Updated: July 11, 2014 01:27 IST

नासुप्रचा लाचखोर अधिकारी नानक वासवानी याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी विश्वस्त मंडळाने यापूर्वी ठराव पारित केला होता. मात्र, यानंतर लोकमतने या विषयाला वाचा फोडल्यानंतर विश्वस्तांनीही

विश्वस्तांचा विरोध : पुनर्स्थापनेचा विषय नामंजूर नागपूर : नासुप्रचा लाचखोर अधिकारी नानक वासवानी याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी विश्वस्त मंडळाने यापूर्वी ठराव पारित केला होता. मात्र, यानंतर लोकमतने या विषयाला वाचा फोडल्यानंतर विश्वस्तांनीही सामाजिक दबावापोटी आपली भूमिका बदलली. गुरुवारी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत जुनी चूक सुधारत विश्वस्तांनी वासवानीच्या पुनर्स्थापनेला एकमुखाने विरोध केला. या संबंधीचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. त्यामुळे आता वासवानीच्या नासुप्रमधील एन्ट्रीला कायमचा ब्रेक लागला आहे. सात वर्षांपूर्वी लाच घेताना रंगेहात सापडलेला नागपूर सुधार प्रन्यासचा निलंबित अधीक्षक अभियंता नानक वासवानी याच्या सेवानिवृत्तीला तीन महिने शिल्लक राहिले असताना त्याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी नासुप्र विश्वस्त मंडळाच्या २८ मे रोजीच्या बैठकीत ठराव संमत केला होता. यानंतर लोकमतने ‘वासवानी नासुप्रचा जावई आहे का? या मथळ्याखाली विशेष लेख प्रसिद्ध करीत या प्रकाराला वाचा फोडली. लोकमतचा दणका कामी आला. वासवानीची नासुप्रतील एन्ट्री रोखण्यासाठी एक जनचळवळ उभी झाली. नासुप्र प्रशासन व विश्वस्तांवर सामाजिक दबाव वाढला. शेवटी विश्वस्त आ. पडोळे, डॉ. छोटू भोयर यांनी स्पष्ट केले की, वासवानीच्या फेरनियुक्तीचा प्रस्ताव हा कोणत्याही विश्वस्ताच्या शिफारशीने सभेपुढे आला नाही. कार्यालयाने सादर केलेल्या विषयावर चर्चा व्हायला हवी होती. दुर्दैवाने ती झाली नाही. या विषयावर कार्यालयाचे मत घेण्यात आले व नियमाप्रमाणे कारवाई व्हावी, असे मत आम्ही मांडले. असे असले तरी पुढील बैठकीत जेव्हा या विषयाचे इतिवृत्त कायम करण्यासाठी ठेवले जाईल, तेव्हा या विरोध करून ते मंजूर होऊ दिले जाणार नाही. कायद्यात तरतूद असली तरी वासवानीला पुन्हा पदावर रुजू होऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. आजच्या बैठकीत संबंधित निर्णयाचे इतिवृत्त कायम करण्याचा विषय होता. याला डॉ. छोटू भोयर, आ. दीनानाथ पडोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांच्यासह सर्वांनीच एकमुखाने विरोध केला. (प्रतिनिधी)वासवानीच्या मुलाबाबत निर्णयाचा अधिकार नाही याच प्रस्तावाच्या दुसऱ्या भागात लाचखोर वासवानी याच्या मुलावर गुन्हे दाखल करण्यासाठी अ‍ॅन्टी करप्श्न ब्युरोला परवानगी देण्याचाही विषय होता. मात्र, वासवानीचा मुलगा हा नासुप्रचा कर्मचारी किंवा अधिकारी नाही. त्याचा नासुप्रशी कुठलाही संबंध नाही. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करावे की नाही याबाबतची परवानगी देण्याचा अधिकार नासुप्रला नाही. ही बाब विचारात घेत मुलावर गुन्हे दाखल करण्यास परवानगी देणे हे आपल्या कार्यकक्षेबाहेरचे आहे, याबाबत तपास यंत्रणेनेच योग्य तो निर्णय घ्यावा, असा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला.