उमरेड : भरधाव अज्ञात वाहनाने विरुद्ध माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना उमरेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरेड-नागपूर मार्गावरील उदासा शिवारात बुधवारी (दि. १४) मध्यरात्र १.२५ वाजेच्या सुमारास घडली.
माेहम्मद अफजल माेहम्मद (३२, रा. माेमीनपुरा, नागपूर) असे मृताचे नाव आहे. माेहम्मद माेटारसायकलने (क्र. एमएच-४७/आयटी-९२१२) जात हाेता. दरम्यान, उदासा शिवारात विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने त्याच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली आणि वाहन लगेच निघून गेले. त्यात माेहम्मदला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक राजू अडाेर्लीकर करीत आहेत.