शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
5
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
6
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
7
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
8
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
9
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
10
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
11
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
12
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
13
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
14
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
15
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
16
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
17
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
18
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
19
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
20
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)

‘सायको किलर’चा थरार

By admin | Updated: February 18, 2015 02:39 IST

उपराजधानीत लागोपाठ तीन दिवसात तीन अनोळखी युवकांचा तीक्ष्ण व धारदार शस्त्राने असंख्य घाव करून निर्घृणपणे खून करणाऱ्या एका ‘सायको किलर’ ला अटक ...

 नागपूर : उपराजधानीत लागोपाठ तीन दिवसात तीन अनोळखी युवकांचा तीक्ष्ण व धारदार शस्त्राने असंख्य घाव करून निर्घृणपणे खून करणाऱ्या एका ‘सायको किलर’ ला अटक करण्यात मंगळवारी कळमना पोलिसांना यश आले. तीन दिवसांपासून रेल्वे क्रॉसिंग आणि तलावाच्या काठावर झुडुपात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून येणाऱ्या मृतदेहांमुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले होते. एखाद्या सायको किलरकडून लागोपाठ तीन खून होण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे.राकेश हरीहाडगे (२२), असे या सायको किलरचे नाव असून तो तुलसीनगर येथील रहिवासी आहे. तो वेडसर आहे. सोमवारच्या रात्रीच त्याला गस्तीवरील पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याजवळ एक मळकट पिशवी आढळली. पिशवीत रक्ताने माखलेले कपडे आणि रक्ताने माखलेला चाकू होता. पोलिसांनी त्याची कसून विचारपूस केली असता त्याने हे तिन्ही खून केल्याचे सांगितले. घटना-११५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुलसीनगर रेल्वे लाईनच्या बाजूच्या नाल्यात अंदाजे ३० वर्षीय युवकाचा नग्नावस्थेत मृतदेह आढळून आला. त्याच्या अंगावर डोक्यापासून कंबरेपर्यंत आणि गुप्तांगावर धारदार व तीक्ष्ण शस्त्राच्या असंख्य जखमा आहेत. मृताची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याचा वर्ण सावळा आणि सडपातळ बांधा आहे. दाढी बारीक, उंची अंदाजे ५ फूट ६ इंच आहे. उजव्या हातात स्टीलचे कडे आणि कंबरेत नाडा आहे. घटना-२सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतच नेहरूनगर रेल्वे क्रॉसिंगजवळ ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला. त्याचीही ओळख पटलेली नाही. त्याच्या डोक्यापासून कंबरेपर्यंत तीक्ष्ण व धारदार शस्त्रांचे असंख्य घाव आहेत. त्याच्या अंगात काळ्या रंगाची जीन्स पँट, नारंगी रंगाचे गोल गळ्याचे टी शर्ट, काळ्या रंगाचे शर्ट आणि मळकट रंगाचे जर्किन आहे. तोही सावळ्या रंगाचा आणि सडपातळ बांध्याचा आहे. त्याची उंचीही ५ फूट ६ इंच आहे. घटना-३तिसरा मृतदेह मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाराद्वारी तलाव बाभळीच्या झुडुपाजवळ आढळून आला. तोही अंदाजे ३०-३५ वयोगटातील आहे. मृतदेह विवस्त्र आहे. त्याच्या मानेवर, छातीवर, पोटावर, मांडीवर, पाठीवर आणि गुप्तांगावर धारदार व तीक्ष्ण शस्त्राच्या असंख्य जखमा आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार हा सायको किलर रात्री बेरात्री भटकायचा, रस्त्यावर जो कुणी आढळेल त्याच्यावर तुटून पडून चाकूने त्याच्या देहाची चाळण करायचा.