शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

महावितरणकडे हजारो मीटर्स, तरीदेखील ‘कनेक्शन’साठी ‘ना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 07:00 IST

महावितरणच्या गोदामांमध्ये हजारो मीटर पडून असल्याचे ‘लोकमत’ शोधून काढले आहे; परंतु कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे मीटरचा साठा नसल्याचा दावा केल्याने हजारो ग्राहकांना बाजारातून चढ्या दराने मीटर खरेदी करावे लागले आहेत.

ठळक मुद्दे२०१८ पासून मीटर्स गोदामांमध्येचग्राहकांवर खुल्या बाजारातून खरेदी करण्याची वेळ

 

आशिष रॉय

नागपूर : देशातील सर्वांत भ्रष्ट वीज वितरण कंपनीचा मान महावितरणला सहज मिळू शकतो, असे चित्र आहे. मोठ्या उद्योगांची कोट्यवधींची बिले बेकायदेशीरपणे माफ करून केवळ मीटर उत्पादकांना फायदा करून देण्यासाठी सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. या परिस्थितीचा फायदा घेत मीटर कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांत त्यांचे दर झपाट्याने वाढवले आहेत.

महावितरणच्या गोदामांमध्ये हजारो मीटर पडून असल्याचे ‘लोकमत’ शोधून काढले आहे; परंतु कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे मीटरचा साठा नसल्याचा दावा केल्याने हजारो ग्राहकांना बाजारातून चढ्या दराने मीटर खरेदी करावे लागले आहेत. मीटरच्या कृत्रिम तुटवड्यामुळे साडेदहा लाखांहून अधिक ग्राहकांना नवीन ‘कनेक्शन’ मिळालेले नाहीत. सुमारे २.२ लाख ग्राहकांनी मागणीचे पैसेही भरले आहेत. हजारो ग्राहकांचे मीटर खराब झाले आहे; परंतु महावितरण ते बदलत नाही आणि सरासरी बिले जारी करत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सरासरी बिलेदेखील जास्त येत आहेत.

महावितरणचे अध्यक्ष सहव्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) विजय सिंघल यांना विचारणा केली असता जीनस कंपनीने उत्पादित केलेले सुमारे ८० हजार मीटर्सचे प्रादेशिक कार्यालयांना २४ तासांच्या आत वाटप केले जाईल, तसेच आम्हाला २० एप्रिल रोजी नवीन मीटर्स मिळत असून, त्यानंतर कमतरता भासणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. महावितरण जाणीवपूर्वक ग्राहकांना मीटर नाकारत असल्याच्या वृत्ताचे संचालक (ऑपरेशन्स) संजय ताकसांडे यांनी खंडन केले.

महावितरणच्या सूत्रांनी सांगितले की, नांदेड आणि जळगाव झोनसाठी नोव्हेंबर २०१९ मध्ये जीनसने निर्मित ५.७३ लाख सिंगल-फेज रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर खरेदी केले आहेत. हजारो मीटर्स बसविण्यात आले. मात्र, ग्राहकांना बाजारातून मीटर घेण्यास सांगत उर्वरित साठा गोदामांमध्ये ठेवण्यात आला. दोन झोनमध्ये महावितरणकडे किती मीटर उपलब्ध आहेत, याची माहिती नाही. याशिवाय, कोकण परिसरात ५२,००० मीटरपेक्षा जास्त मीटर्स उपलब्ध असल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते. महावितरण थ्री-फेज मीटरसाठी सुमारे सोळाशे रुपये आकारते; परंतु बाजारात त्याची किंमत किमान चार हजार रुपये आहे. कंपनी सिंगल फेज मीटरसाठी ९५० रुपये घेते, ज्याची खुल्या बाजारात किंमत १ हजार ८०० रुपये आहे.

‘लोकमत’ने ३१ मार्च रोजी मीटरच्या तीव्र टंचाईची बातमी दिल्यानंतरच महावितरणने मीटरचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी कंपनीकडे निधीची कमतरता असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले होते. आता त्याचे खरे कारण समोर आले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण