लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : माैदा तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असून, ती आता १,८०० च्या वर गेली आहे. हे संक्रमण राेखण्यासाठी नागरिकांनी मनात भीती न बाळगत काेराेनाची चाचणी करवून घ्यावी तसेच प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहन तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी केले आहे.
काेराेना टेस्ट केल्याने आपण पाॅझिटिव्ह आहाेत की, निगेटिव्ह हे कळते. रिपाेर्ट पाॅझिटिव्ह आल्यास रुग्णांवर तातडीने याेग्य उपचार करणे साेयीचे व साेपे जाते. टेस्ट करण्यास दिरंगाई केल्यास पाॅझिटिव्ह रुग्णामुळे संपूर्ण कुटुंब व त्या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती पाॅझिटिव्ह हाेऊ शकतात. मनात भीती बाळगणे, आजार अंगावर काढणे व लपविणे या बाबी काेराेना संक्रमणास कारणीभूत ठरत असून, प्रत्येकाच्या जीविताच्या दृष्टीने धाेकादायक ठरत असल्याेचही प्रशांत सांगडे यांनी सांगितले.
माैदा शहरातील धनजाेडे सभागृहात ५० खाटा क्षमता असलेले काेविड हाॅस्पिटल सुरू करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे, असेही तहसीलदार सांगडे यांनी स्पष्ट केले. काेराेनावर मात करण्यासाठी नागरिकांनी काही काळ घरी सुरक्षित राहावे, मास्कचा नियमित वापर करावा, गर्दीत जाणे टाळावे, खरेदी करताना दुकानांसमाेर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, या महामारीवर मात करण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार प्रशांत सांगडे व वैद्यकीय अधिकारी डाॅ. साेनसरे यांनी केले आहेे.
...
दिरंगाईमुळे इन्फेक्शन वाढते
ताप, सर्दी, खाेकला, अंगदुखी अशी लक्षणे आढळून आल्यानंतरही नागरिक तातडीने काेराेना टेस्ट न करता खासगी डाॅक्टरांकडून औषधाेपचार करवून घेतात. सहा-सात दिवसांत आराम न झाल्यास टेस्ट करायला जातात. या काळात काेराेना विषाणूचे इन्फेक्शन फुप्फुसापर्यंत पाेहाेचते. त्यामुळे फुप्फुसे डॅमेज हाेतात. शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याने ऑक्सिजन पातळी कमी हाेत जाते. अशा परिस्थितीत रुग्णाला ऑक्सिजनची नितांत गरज भासते. ऑक्सिजन वेळेवर न मिळाल्यास रुग्ण दगावू शकताे. मात्र, वेळेवर टेस्ट करून औषधाेपचाराचा सुरुवात केली तर हा धाेका व त्या रुग्णापासून हाेणारे संक्रमण कमी करता येऊ शकते, अशी माहिती तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. रूपेश नारनवरे यांनी दिली.