शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

गुप्तचर यंत्रणेचा अलर्ट

By admin | Updated: July 25, 2015 03:02 IST

याकूबची फाशी अतिसतर्क राहा सामाजिक सलोखा कायम राखा

नरेश डोंगरे नागपूरयाकूबच्या फाशीच्या अनुषंगाने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा राज्य गुप्तचर यंत्रणेने राज्यातील पोलीस यंत्रणेला दिला आहे. एवढेच नव्हे तर, सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी अतिसतर्क राहा आणि खबरदारीच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने अमलात आणा, असे आदेश शिर्षस्थ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. खास सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईहून जारी झालेल्या या अलर्टमध्ये याकूबच्या फाशीच्या अंमलबजावणीनंतरच्या संभाव्य स्थितीचा अंदाज घेण्यात आला आहे. राज्यात गोहत्या बंदी कायदा संमत झाला. त्यामुळे एका विशिष्ट वर्गात तीव्र नाराजी आहे. त्यात आरक्षणाचेही भिजत घोंगडे असल्यामुळे राज्यातील विशिष्ट गटात नाराजीचा सूर आहे. अशात याकूबच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाल्यानंतर काय होऊ शकते, त्याचा अंदाज घेऊन पोलिसांना सतर्क राहाण्याचा इशारा देण्यात आला आहे. सामाजिक सौहार्द्रता धोक्यात येऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ऐनवेळी धावपळ करण्याऐवजी आधीपासूनच सामाजिक सलोखा जपण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याच्या सूचना पोलीस यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, नागपूर शहरासह सर्वच भागातील पोलीस अधिकाऱ्यांनी खबरदारीच्या उपाययोजनांची यादीच बनविणे सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी आणि शनिवारी शिर्षस्थ अधिकारी आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि हे अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांच्या बैठका घेत असून, काहींनी खबरदारीच्या उपाययोजनांचे आदेश दिले आहे. समाजकंटकांवर विशेष लक्षसामाजिक सलोखा कसा जपता येईल, त्याबाबत वेगवेगळ्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे.ठिकठिकाणच्या समाजकंटकांवर तपास यंत्रणा विशेष लक्ष ठेवून आहे. दरम्यान, याकूबच्या फाशीच्या संबंधाने निर्माण झालेल्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली आहे. एसआयडीचे स्थानिक अधिकारी, कर्मचारी सकाळपासून रात्रीपर्यंत कारागृहाच्या परिसरात हजर असतात. परिसरात येणाऱ्या प्रत्येकाच्या हालचाली टिपण्यासोबत त्यांच्याकडून काही माहिती मिळते काय, त्याचीही चाचपणी ही मंडळी करीत आहे. कारागृहातून पेशीवर नेल्या जाणाऱ्या कैद्यांकडून आतमधील स्थितीचा आढावा घेण्याचीही या मंडळीची धडपड दिसते.उपराजधानीतील सामाजिक सलोखा नेहमीप्रमाणेच कायम राहील. येथे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही किंवा कायदा आणि सुव्यवस्थेची स्थितीही निर्माण होणार नाही. मात्र, तसे काही झाल्यास आम्ही पूर्णपणे सज्ज असून, समाजात तेढ निर्माण करू पाहाणाऱ्या समाजकंटकांना पोलीस नेहमीसाठी धडा शिकवतील.- शारदा प्रसाद यादव पोलीस आयुक्त, नागपूर. नागपूर जिल्ह्यातील सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व सामाजिक नेते, कार्यकर्त्यांची त्यासाठी मदत घेतली जात असून, जिल्ह्यात कसलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची पूर्ण खात्री आहे. दुर्दैवाने कुणी तसे प्रयत्न केले तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. - डॉ. आरती सिंगपोलीस अधीक्षक, नागपूर