श्रीसूर्यावर ३५ हजार पानाचे आरोपपत्र नागपूर : आरोपपत्र दाखल करतेवेळी शुक्रवारी आरोपींपैकी पल्लवी जोशी, निशीकांत मायी, श्रीकांत प्रभुणे, दिलीप डांगे, नितीन केसकर आणि आनंद जहागीरदार उपस्थित होते. त्यांना आरोपपत्राच्या प्रती स्वाधीन करण्यात आल्या. समीर जोशी आणि मनोज तत्त्वादी हे नागपूर मध्यवर्ती कारागृहात तर मोहन पितळे, मुकुंद पितळे आणि शंतनू कुऱ्हेकर हे अकोला कारागृहात असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले नाही. त्यांच्या आरोपपत्राच्या प्रती कारागृहांकडे रवाना करण्यात आल्या. न्यायालयात विशेष सरकारी वकील अॅड. बी. एम. करडे, अॅड. भारत बोरीकर, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, सहायक पोलीस निरीक्षक नीरज चौधरी, कतक धोंड, तपास पथकातील पोलीस कर्मचारी चक्रधर राऊत, महेंद्र सरोदे आणि अनिल धानोडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सहा आरोपी न्यायालयात हजर
By admin | Updated: July 25, 2015 03:09 IST