शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

...अन् म्हणून आले होते दुसऱ्यांदा सीबीआयचे पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:08 IST

नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी प्रदीर्घ तपासणी तसेच चाैकशी करून ...

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी प्रदीर्घ तपासणी तसेच चाैकशी करून निघून गेलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना रस्त्याने जाताना जुन्या संगणक, लॅपटॉपची आठवण झाली अन् त्याचमुळे ते पुन्हा परतले. दुसऱ्यांदा परत जाताना त्यांनी देशमुख यांच्याकडच्या जुन्या संगणक, लॅपटॉपच्या हार्डडिस्कची तपासणी करून त्या ताब्यात घेतल्या.

तब्बल ११ तास चाैकशी करणारे सीबीआयचे पथक देशमुख यांच्या निवासस्थानाहून बाहेर पडल्यानंतर लगेच अर्धा तासाने पुन्हा कशासाठी परतले, नंतरच्या दोन तासांत त्यांनी कोणती चाैकशी केली आणि काय सोबत नेले, असे विविध प्रश्न चर्चेला आले आहेत. ‘लोकमत’ने ते जाणून घेण्यासाठी या संबंधाने संबंधित सूत्रांकडे सकाळपासून पाठपुरावा केला. मात्र, सीबीआय अथवा देशमुख यांच्याकडून कसलीही अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही. तथापि, खास सूत्रांकडून उपरोक्त माहिती पुढे आली. त्यानुसार, शनिवारी सकाळी ७.३० ते ७.४५च्या सुमारास २ महिलांसह १० जणांचा समावेश असलेले सीबीआयचे पथक देशमुखांच्या निवासस्थानी दाखल झाले. या पथकाने येथे सलग ११ तास चाैकशी केली. त्यांनी देशमुख यांच्या निवासस्थानाचा कानाकोपरा तपासला. प्रत्येक कपाट, लॉकर, टेबलचे ड्रॉवर, संगणक आणि मोबाइलचीही तपासणी केली. प्रत्येक कागदपत्रांचीही बारकाईने पाहणी करून त्यातून काही नोंदी केल्यानंतर देशमुख यांची चौकशी केली. हे काय आहे, ते कुठून आणले, कधी घेतले वगैरे अशा स्वरूपाची ही चाैकशी होती. ती आटोपल्यानंतर सायंकाळी ६.३० ला चार अधिकारी अर्टिगा तर ६ अधिकारी इनोव्हात बसून निघून गेले. परत जाताना अधिकाऱ्यांनी आपसात चर्चा करताना घरात काही जुने संगणक, लॅपटॉप पडले होते, त्याची आठवण झाली. त्याचमुळे पुन्हा पाच अधिकारी एका वाहनात आले आणि त्यांनी पुन्हा त्या संगणक, लॅपटॉपची तपासणी केली. त्यांच्या हार्डडिस्क आणि अन्य काही पार्ट ताब्यात घेतले. नंतर ९.३० ला हे पथक निघून गेले.

---

ते पुन्हा येतील ।

दुसऱ्या वेळी जेव्हा अधिकारी देशमुखांच्या निवासस्थानी धडकले तेव्हा आता काही तरी वेगळी कारवाई होणार, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली. त्याचमुळे देशमुखांच्या निकटस्थ मंडळींनी निवासस्थानासमोर जमायला सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या वेळीदेखील अधिकाऱ्यांचे पथक निघून गेल्याने ते पुन्हा परत येतील, असा अंदाज बांधत मध्यरात्री १ वाजेपर्यंत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह अनेक जण तेथे उभे होते. देशमुख काटोल दाैऱ्यावरून परतले अन् पहाटे २ नंतर गर्दी ओसरली.

----

‘ती’ वाहने सीबीआयचीच

सीबीआयचे अधिकारी ज्या वाहनातून आले तरी नवी कोरी, चकचकीत नव्हे तर पाच-दहा वर्षे जुनी असल्यासारखी दिसत होती. अर्टिगा दिल्ली पासिंगची (डीएल २ - सीएव्ही ८८९८) तर इनोव्हा (एमएच ३१- डीझेड ९९९९) नागपूर पासिंगची होती. आयपीएस अधिकाऱ्यांच्या वाहनावर

प्रोटोकॉलनुसार निळा दिवा असतो. मात्र, असा कोणताही दिवा दोन पैकी एकाही गाडीवर नव्हता. त्यामुळे ही वाहने कुणाची आहेत, असा प्रश्नही पत्रकार मंडळी उपस्थित करीत होते. ही दोन्ही वाहने नागपूर आणि नवी दिल्ली सीबीआय कार्यालयाचीच असल्याचे आज स्पष्ट झाले.

---