ईबेच्या माध्यमातून विक्रीची संधी : ‘कॅट व ईबे’तर्फे कार्यशाळानागपूर : आॅनलाईन विक्रीवर जागरूकता आणून नागपुरातील व्यापाऱ्यांना ईबेच्या माध्यमातून आपला व्यवसाय जागतिक तसेच राष्ट्रीय पातळीवर नेण्याची गरज आहे. स्पर्धेत व्यापाऱ्यांसमोर येणारी आव्हाने आधुनिकीकरणाच्या माध्यमातून त्यांनाच सोडवायची आहे. आधुनिक व्यवसायासाठी किरकोळ व्यापाऱ्यांनी सक्षम व्हावे, असे आवाहन विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी येथे केले. व्यापाऱ्यांमध्ये आॅनलाईन विक्रीबद्दल जागरूकता वाढीस लागावी यासाठी कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (कॅट) आणि ईबे इंडिया यांनी एकत्रितपणे ई-कॉमर्स जागरूकता कार्यशाळेचे आयोजन नुकतेच केले. रिटेल आयात आणि देशांतर्गत ईबेच्या माध्यमातून ई-कॉमर्सच्या उपलब्ध विक्रीच्या संधीची विस्तृत माहिती देण्यात आली. यावेळी कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया, सचिव प्रवीण खंडेलवाल, नागपूरचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर, व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, ईबे इंडियाच्या स्ट्रेटेजिक अलायन्स विभागाचे प्रमुख पंकज उके उपस्थित होते. याप्रसंगी विविध विषयावर विचारमंथन करण्यात आले. ईबे इंडिया व कॅटमध्ये करारभारतीय व्यापाऱ्यांना आधुनिक विचार देणे व त्यांना शिक्षित करण्याचे उद्दिष्ट बाळगून ईबे इंडिया आणि कॅट यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यासाठी कॅटच्या रिटेल स्कूलमध्ये ई-कॉमर्स सेंटर आॅफ एक्सलन्स (सीओई) उभारण्यात आले आहे. सीओईने भारतातील व्यापाऱ्यांसाठी एक देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. राष्ट्रीय पातळीवर जागृती अभियान ईबे आणि कॅट संयुक्तपणे करणार आहे. त्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांना ईबेद्वारे तब्बल २०१ देशांत आणि भारतातल्या ४,३०६ ठिकाणे रिटेल आयात करता येणार आहे. या मोहिमेमुळे व्यापारी प्रत्यक्ष दुकानातून चालणारा व्यापार अबाधित ठेवून अतिरिक्त व्यापार माध्यम असलेल्या आॅनलाईन देशांतर्गत बाजारपेठेत आपापला व्यापार अधिक सक्षम बनवू शकतील.व्यापाऱ्यांना प्रोत्साहनबी.सी. भरतीया यांनी सांगितले की, ईबेसारख्या बाजारपेठांमार्फत ई-कॉमर्स केल्याने भारतीय व्यापाऱ्यांना कमीत कमी गुंतवणूक करून वैयक्तिकरीत्या आपापला व्यापार वाढविण्याच्या मुबलक संधी मिळतील. रिटेल आयातीमार्फत आपला व्यवसाय केवळ देशच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा वाढू शकतो, याबात भारतीय व्यापाऱ्यांचे डोळे उघडण्याचे काम या कार्यशाळेने केले आहे. (प्रतिनिधी)ईबे देशातील आॅनलाईन बाजारपेठईबे ही देशातील आघाडीची आॅनलाईन बाजारपेठ असून देशातील ४,३०६ महानगरे, शहरे आणि गावांमध्ये ईबेचे २१ लाख अॅटिव्ह यूजर्स आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून ईबे इंडिया या बाजारपेठेच्या माध्यामातून व्यापाऱ्यांना त्याच्या विक्रीचा आकडा वाढविण्यात चालना देत आहे. सध्या ईबे इंडियावर ३० हजार व्यापारी देशभर विक्री करीत असून १५ हजार व्यापारी रिटेल आयात संधीद्वारे जगभरातल्या १२.८ कोटी ग्राहकांकडे विक्री करीत आहे. भारतीय उद्योजकांनी इलेक्ट्रॉनिक्स, लाईफस्टाईल तसेच विविध श्रेणींमधल्या वस्तू प्रदर्शित केल्या आहेत. तसेच कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडया ट्रेडर्स ही भारतातील व्यापाऱ्यांची एक प्रतिनिधिक संस्था असून जागतिक आव्हानांना सामोर जाण्यासाठी भारतीय रिटेल व्यापाराला सक्षम बनविणे हे या संस्थेचे ध्येय आहे.
ई-कॉमर्समध्ये रिटेलचे भविष्य
By admin | Updated: July 11, 2014 01:23 IST