शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

ग्रीक, इजिप्तच्या व्यापाऱ्यांच्या खेळाचे अवशेष नागपुरात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:06 IST

निशांत वानखेडे नागपूर : जिल्ह्यातील कुहीजवळ भिवकुंड येथील गुफामध्ये अतिप्राचीन काळात खेळल्या जाणाऱ्या अनोख्या खेळाचा शोध लागला आहे. याला ...

निशांत वानखेडे

नागपूर : जिल्ह्यातील कुहीजवळ भिवकुंड येथील गुफामध्ये अतिप्राचीन काळात खेळल्या जाणाऱ्या अनोख्या खेळाचा शोध लागला आहे. याला ‘फोनेशियन’ किंवा ‘मनकला’ म्हणून ओळखले जाते. इ.स. पूर्व ६ ते ३ ऱ्या शतकात हा खेळ इजिप्त, ग्रीक, आफ्रिका आदी देशात लोकप्रिय असल्याचे अवशेष सापडतात. हे २६०० वर्षापूर्वीचे अवशेष असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर हा शोध अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे.

यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आकाश गेडाम आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रवास व पर्यटन विभागाचे प्रा. डॉ. प्रियदर्शनी खोब्रागडे यांच्यासह विद्यार्थी अमर बरसागडे, प्रमोद चव्हाण यांनी कुहीवरून ११ किमीवर असलेल्या भिवकुंड येथे या खेळाच्या अवशेषाचा शोध घेतला आहे. डॉ. आकाश गेडाम व ॲड. गणेश हलकरे हे काही वर्षांपासून विदर्भातील कातळशिल्पा(रॉक आर्ट)चा अभ्यास करीत असून, गुफा व लेण्यांच्या भेटीतून हा शोध लागला आहे. मनकला या खेळाचा एकही प्राचीन पुरावा भारतात आढळत नाही, त्यामुळे या शोधाला विशेष महत्त्व आहे.

सप्टेंबर २०२० मध्ये सोसायटी ऑफ साऊथ एशियन आर्किओलॉजी पुणे, श्रीलंका नॅशनल कमिशन फॉर युनेस्को, श्री जयवर्धनेपुरा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये यावर डॉ. गेडाम यांनी शोधपत्र सादर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळविली आहे.

गुफेतील अवशेष व खेळ

भिवकुंडच्या गुफा क्र. २ मध्ये २ ते ३ व्यासाचे व तेवढ्याच खोलीचे काही खोलगट खड्डे आढळले. ते प्रमाणबद्ध पद्धतीने उकरले असल्याचे लक्षात येते. हा तोच प्राचीन खेळ असल्याचे समजते. यामध्ये दोन खेळाडू खेळत असून, खेळणी म्हणून शंख-शिंपले, कवळ्या, बिया व लहान दगडाचा वापर होत असेल. जो अधिक खेळणी जिंकेल तो विजेता ठरत असल्याचे डॉ. गेडाम यांनी सांगितले.

अवशेषांचे संदर्भ कुठे? कुठे?

इ.स. पूर्व ६ ते ३ ऱ्या शतकात फोनशियन जमातीचे व्यापारी हा खेळ खेळत असल्याची माहिती आहे. तसेच खेळाचे अंकन इजिप्तमधील पिरॅमिड, कारनाक मंदिरातही आढळते. पूर्व आफ्रिका व उत्तर अमेरिकेत या खेळाचे अवशेष सापडले आहेत. आफ्रिकेत ‘वारी’ व ‘ओव्हरे’ नावाने तो लोकप्रिय आहे. आपल्या देशात दक्षिणेकडे विजयनगर साम्राज्यात ‘पोलिगुझी’ या नावाने हा खेळ खेळण्याचे संदर्भ आढळले असल्याचेही डॉ. गेडाम यांनी सांगितले.

भिवकुंडजवळ असलेल्या आडम येथे एएसआयने चारदा केलेल्या उत्खननात प्राचीन बौद्ध स्तूप, रोमन नाणी व ‘अस्सक जनपदस्य’ नावाचा शिक्का सापडला आहे. प्राचीन काळी इजिप्त व ग्रीकमधून आलेल्या व्यापाऱ्यांनी हा खेळ त्यांच्यासोबत आणला असावा. हा प्रदेश प्राचीन अस्सक जनपदात मोडत असल्याने, मनकला या खेळाला ‘अस्सकला’ असे वैदर्भीय नामकरण करणे योग्य वाटते.

- प्रा. डॉ. आकाश गेडाम, गणित व मानविकी विज्ञान