शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पोलीस दल ‘स्मार्ट’ बनविणार

By admin | Updated: November 30, 2015 02:33 IST

पोलीस दलाचे केवळ मनुष्यबळ वाढवून चालणार नाही. तर, मनुष्यबळासोबतच माहिती व तंत्रज्ञानाची जोड देऊन राज्य पोलीस दलाला ‘स्मार्ट ’बनविण्यावर आपला भर आहे.

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : मनुष्यबळासोबत माहिती व तंत्रज्ञानाची जोड नागपूर : पोलीस दलाचे केवळ मनुष्यबळ वाढवून चालणार नाही. तर, मनुष्यबळासोबतच माहिती व तंत्रज्ञानाची जोड देऊन राज्य पोलीस दलाला ‘स्मार्ट ’बनविण्यावर आपला भर आहे. यामुळे कमी मनुष्यबळात नागरिकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यात यश मिळेल आणि गुन्हेगारांवरही जरब बसविणे शक्य होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पोलीस नियंत्रण कक्षातील अद्ययावत ‘डीसीआरएमएस डायल १००’ प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी सकाळी केले. याप्रसंगी ते बोलत होते. या निमित्त नियंत्रण कक्ष परिसरात आयोजित कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि खासदार विजय दर्डा, महापौर प्रवीण दटके, आमदार प्रकाश गजभिये, आमदार सुधाकर देशमुख मंचावर उपस्थित होते. ही अत्याधुनिक यंत्रणा नागपूर पोलिसांनी सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रारंभीच पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव आणि त्यांच्या चमूचे अभिनंदन केले. डीसीआरएमएस डायल १००, सीसीटीव्ही प्रणालीमुळे पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचतील. गुन्हेगारांना जेरबंद करून ते गुन्ह्यांचा तातडीने उलगडा करू शकतील आणि कोर्टात गुन्हेगारांविरुद्ध ठोस पुरावे सादर करून दोष सिद्धतेचे प्रमाण वाढवता येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर सीसीटीव्ही नेटवर्क लावण्याबाबत तत्कालीन सरकारने निर्णय घेतला. मात्र, त्याची पूर्तता करण्यात कमालीची दिरंगाई झाली. आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या चार महिन्यांत आम्ही वर्क आॅर्डर दिली आणि सीसीटीव्ही नेटवर्कचा पहिला फेज ( १२०० कॅमेऱ्यांचा) पूर्ण झाला. त्याचा लोकार्पण सोहळा सोमवारी पार पडणार आहे. सीसीटीव्ही नेटवर्कचा उर्वरित टप्पा आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करू. त्यानंतर जगातील सर्वात मोठे, चांगले आणि अत्याधुनिक सीसीटीव्ही नेटवर्क मुंबईचे मानले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. नागपुरात वर्षभरात सीसीटीव्ही नेटवर्क उभारण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी जुन्या यंत्रणेतील दोष आणि नवीन यंत्रणेची वैशिष्ट्ये विशद केली. नव्या प्रणालीमुळे होणारे फायदेया नवीन यंत्रणेमुळे अनेक फायदे होतील. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सहा मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहचतील.पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर काय कारवाई झाली, त्याची माहिती संबंधित व्यक्तीला एसएमएसच्या माध्यमातून मिळेल. नियंत्रण कक्षात विनाकारण फोन करून खोटी माहिती देणाऱ्या, पोलिसांची दिशाभूल करणाऱ्यांना शोधून काढणे शक्य असल्यामुळे हे गैरप्रकार बंद होतील आणि खरेच ज्यांना गरज आहे, त्यांना तात्काळ मदत करणे पोलिसांना शक्य होईल.नागरी वस्त्यांमध्ये पोलिसांचा वावर वाढल्यामुळे गुन्हेगारीला अंकूश बसेल. कायदा व सुव्यस्थेची स्थिती अबाधित राहील. पोलिसांची तात्काळ मदत मिळाल्याने नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढेल आणि ‘जनता-पोलीस’ यांच्यातील संबंध चांगले होतील.