शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

हृदय बंद पडल्यावरही जिवंत राहू शकेल माणूस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 23:50 IST

हृदयाची प्रक्रिया थांबणे म्हणजे मृत्यू हे वैद्यकीय क्षेत्राने मान्यच केले आहे. मग पुढे काही करणे शक्य नाही असे वाटत असेल तर थांबा। अशुद्ध रक्ताला शुद्ध करून ऑक्सिजनसह शरीराच्या सर्व अंगांना पोहचविणे हे हृदयाचे काम. नैसर्गिकरीत्या चालणारे हृदयाचे काम जर कृत्रिमरीत्या चालविणे शक्य झाले तर? या तरचे उत्तर भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर(बार्क)ने संशोधनातून पुढे आणले आहे. बार्कच्या टीमने ‘आर्टिफिशियल मॅग्नेटिक हार्ट पंप’चे तंत्र साकार केले असून, अमेरिकेसह जर्मनी व फ्रान्सकडून त्याचे पेटंटही प्राप्त केले आहे.

ठळक मुद्देबार्कच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय पेटंट : जतिंदर याखमी यांचे प्रेझेंटेशन

निशांत वानखेडे/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हृदयाची प्रक्रिया थांबणे म्हणजे मृत्यू हे वैद्यकीय क्षेत्राने मान्यच केले आहे. मग पुढे काही करणे शक्य नाही असे वाटत असेल तर थांबा। अशुद्ध रक्ताला शुद्ध करून ऑक्सिजनसह शरीराच्या सर्व अंगांना पोहचविणे हे हृदयाचे काम. नैसर्गिकरीत्या चालणारे हृदयाचे काम जर कृत्रिमरीत्या चालविणे शक्य झाले तर? या तरचे उत्तर भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर(बार्क)ने संशोधनातून पुढे आणले आहे. बार्कच्या टीमने ‘आर्टिफिशियल मॅग्नेटिक हार्ट पंप’चे तंत्र साकार केले असून, अमेरिकेसह जर्मनी व फ्रान्सकडून त्याचे पेटंटही प्राप्त केले आहे.नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सतर्फे आयोजित राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेसाठी उपस्थित असलेले बार्कचे निवृत्त सहसंचालक व डीएईचे माजी चेअरमन डॉ. जतिंदर याखमी यांनी लोकमतशी बोलताना याविषयी माहिती दिली. वास्तविक आर्टिफिशियल हार्ट पंपिंगचे एक उपकरण जर्मनीने विकसित केले आहे. मात्र ते शरीराशी जुळलेले नसते, वॉकरसारखे सोबत चालवत न्यावे लागते व त्याचे वजनही खूप असते. शिवाय त्याची किंमतही ४० लाख रुपये असून, ते पूर्णपणे विद्युतवर अवलंबून आहे, म्हणजे वीज पुरवठा खंडित झाला की ते बिनकामाचे ठरण्याची शक्यता आहे. याबाबत चेन्नईचे कार्डिओसर्जन डॉ. के. आर. बालकृष्णन यांनी एक आव्हान आमच्यासमोर ठेवले होते. त्यावर बार्कचे एस.एम. युसूफ यांनी कार्य सुरू केले. डॉ. याखमी हे त्याचे समन्वयक होते. त्यांच्या मते, हे तंत्र मॅग्नेटिक इफे क्टशी जुळलेले आहे. हृदयातकाही बिघाड झाला किंवा ब्लॉकेजेस आले तर लहान-मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. मात्र अनेकवेळा या शस्त्रक्रियांमुळे इनफेक्शन होण्याचा धोका असतो.बार्कच्या संशोधकांनी मॅग्नेटिक प्रभावाने कृत्रिमपणे हृदय पंपिंगचा फॉर्म्युला विकसित केला. पॉलियुरिथेन या पॉलिमर लिक्वीडमध्ये मॅग्नेटेड नॅनो पार्टिकल्सच्या मिश्रणाने मॅग्नेटिक इफेक्ट तयार केला जातो व त्याद्वारे हार्ट पंप केले जारू शकते. हृदयाच्या झडपांचा वेग कमी-जास्त करण्याचे व ते सतत सुरू राहील, याचे तंत्रही बार्कच्या फॉर्म्युल्यामध्ये मांडण्यात आले आहे. विशेष म्हणजे याचे वजन एक ते दीड किलोच्या वर नाही व ते सहज हृदयाजवळ जोडणे शक्य असल्याची माहिती डॉ. याखमी यांनी दिली. बार्कच्या या तंत्राला आंतरराष्ट्रीय पेटंट म्हणून मान्यता मिळाली आहे. अणुऊर्जेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या बार्कने हा फॉर्म्युला मांडला असून, आता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्यास मूर्तरूप द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. हे उपकरण विकसित झाले तर क्रांतिकारी ठरेल, असा विश्वास डॉ. याखमी यांनी व्यक्त केला.स्वप्रभावाने चालेल का एखादी वस्तू ?विश्वातील सर्व सजीव प्राणी स्वत:ची ऊर्जा स्वत: तयार करून हालचाली करीत असतात. मात्र निर्जीव वस्तू बाह्य प्रभावाशिवाय हालचाली करू शकत नाही. विमान असो की रिमोटने चालणारे ड्रोन, म्हणजे अशा प्रत्येक गोष्टींच्या हालचालीसाठी बाहेरून ऊर्जा पुरविणे आवश्यक असते. रोबोटही बाह्य तंत्रज्ञानाच्या प्रभावानेच हालचाल करू शकतो. पण एखादी वस्तू जी स्वत:च स्वत:ची ऊर्जा निर्माण करून स्वप्रभावाने हालचाल करेल, हे शक्य आहे का? म्हणजे स्वत:च रासायनिक ऊर्जा मेकॅनिकलमध्ये आणि मेकॅनिकल ऊर्जा रासायनिकमध्ये परावर्तित करून हालचाल करणे शक्य आहे काय, यावर जगभरातील संशोधकांचे प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. याखमी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाscienceविज्ञान