शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

शक्ती-अहिंसकची आॅनलाईन शिक्षण क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 01:34 IST

दहावी-बारावीनंतर करिअरची निवड करताना अनेक प्रकारचे संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनात असतात. हीच अवस्था स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबतही असते.

ठळक मुद्देदोन भावंडांची संकल्पना : तयार केला ‘ शिक्षा अ‍ॅप’, तीन भाषेत शैक्षणिक मार्गदर्शन

निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहावी-बारावीनंतर करिअरची निवड करताना अनेक प्रकारचे संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनात असतात. हीच अवस्था स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबतही असते. मुलांना योग्य सल्ला आणि माहिती मिळत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तर शहरात राहण्या- खाण्यापासून अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण लक्षात घेता, नागपूरच्या शक्ती आणि अहिंसक चव्हाण या दोन भावंडांनी ‘शिक्षा अ‍ॅप’ विकसित केला आहे. गुगलने याला मान्यता देऊन सर्वसामान्यांसाठी प्ले स्टोअरवर हा अ‍ॅप उपलब्ध केला आहे.कपिलनगर येथे राहणाºया शक्ती आणि अहिंसक या दोन भावंडांच्या जिद्दीतून आॅनलाईन शिक्षणाच्या संकल्पनेत एक नवीन क्रांती उदयास आली आहे. वडील शिर्शानंद चव्हाण हे जिल्हा ग्रंथालयात नोकरीवर आहेत. शक्तीने बीबीए व कॉम्प्युटरचा कोर्स केला तर अहिंसकने बी.कॉम. पूर्ण केले. शक्तीने स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेतून भारतीय सैन्यात क्लरीकल विभागात नोकरी प्राप्त केली. मात्र स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आलेल्या अडचणींची त्याला कल्पना होती. या अडचणी दूर करण्याची जिद्द त्याच्या मनात निर्माण झाली आणि वर्षभरात नोकरी सोडून त्याने ‘शिक्षा अ‍ॅप’ विकसित करण्याच्या कामाला सुरुवात केली. या प्रकल्पात त्याला लहान भाऊ अहिसंकची मदत मिळाली. त्यांच्या मेहनतीतून एक कंपनी निर्माण झाली व यातून दीड वर्ष मेहनत घेत हा अ‍ॅप विकसित केला.विविध अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबत माहिती देणारे अनेक वेबसाईट आणि मोबाईल अ‍ॅप इंटरनेटवर उपलब्ध आहेत. मात्र चव्हाण बंधूंच्या शिक्षा अ‍ॅपमध्ये वेगळी विशेषता आहे. सर्वांना सहज आकलन होईल यासाठी त्यांनी हे अ‍ॅप इंग्रजी, मराठी आणि हिंदी या तिन्ही भाषेत तयार केले आहे. हे अ‍ॅप अगदी नि:शुल्क उपलब्ध करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी घरबसल्या या अ‍ॅपमधून अभ्यास करू शकेल, असा विश्वास चव्हाण बंधूंनी व्यक्त केला. सध्या या अ‍ॅपवर यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, रेल्वे, एसएससी, पोलीस भरती आदी स्पर्धा परीक्षांची माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध केले आहे. पोलीस भरती, तलाठी किंवा जिल्हा परिषदेच्या परीक्षांबाबत मार्गदर्शन करणारे कदाचित हे पहिले अ‍ॅप असेल, असा दावा शक्तीने केला. आवश्यक कोर्स, अभ्यासक्रम, पुस्तकांसह व्हिडीओ कौन्सिलिंग, तज्ज्ञ शिक्षकांद्वारे व्हिडीओ मार्गदर्शन या अ‍ॅपवर उपलब्ध केले आहे. सामान्य ज्ञानापासून परीक्षांबाबतची माहिती वेळोवेळी अपडेट करण्याची व्यवस्थाही त्यांनी केली आहे.हे अ‍ॅप तयार करण्यासाठी लाखोंचा खर्च आला. प्रसंगी घर गहाण ठेवावे लागले. यावेळी मित्र, नातेवाईकांनी मोठी मदत केली. अनेक आर्थिक आणि शैक्षणिक अडचणींवर मात करून हे अ‍ॅप विकसित करण्याचे समाधान त्यांच्या चेहºयावर आहे. एक कंपनी स्थापन करून ४५ लोकांच्या टीमद्वारे या अ‍ॅपचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणास्रोत मानणाºया शक्ती व अहिंसकने बाबासाहेबांच्या शाळा प्रवेश दिनाला अ‍ॅप समर्पित असल्याची भावना व्यक्त केली.तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शनअ‍ॅपमधील अपडेट्स आणि अ‍ॅनिमेशनसह व्हिडीओद्वारे शिक्षकांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे काम होते. यासाठी त्यांनी जवळपास ६०० शिक्षकांची मुलाखत घेतली. त्यापैकी ५ ते २५ वर्षांचा अनुभव असलेल्या विविध विषयांतील तज्ज्ञ अशा ५० ते ६० शिक्षकांची निवड केली. त्यांच्या मार्गदर्शनाचे व्हिडीओ शूट करून ते अपलोड केले. यामध्ये नियमित बदल करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षा अ‍ॅप वेबसाईटवरही उपलब्ध केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासह आॅनलाईन टेस्टची व्यवस्थाही योग्य सोल्यूशनसह यामध्ये उपलब्ध आहे.भविष्यात बरेच काहीसध्या केवळ स्पर्धा परीक्षांची माहिती व मार्गदर्शन अ‍ॅपवर उपलब्ध आहे. मात्र लवकरच यामध्ये दहावी-बारावीच्या अभ्यासक्रमासह जेईई, एआयपीएमटी, एआय ट्रिपल ई, डिफेन्स सेवेत जाणाºयांसाठी एनडीए आदी सर्व परीक्षा आणि अभ्यासक्रमांची माहिती आणि योग्य मार्गदर्शन उपलब्ध करण्यात येणार असल्याचे शक्ती याने स्पष्ट केले.