नागपूरमध्ये फडणवीसांचा करिश्मा चालला, सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाला मोठी आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 12:07 IST2026-01-16T12:06:34+5:302026-01-16T12:07:43+5:30
Nagpur Municipal Corporation Election Result: राज्याची उपराजधानी आणि आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होमग्राऊंड असलेल्या नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे.

नागपूरमध्ये फडणवीसांचा करिश्मा चालला, सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाला मोठी आघाडी
राज्याची उपराजधानी आणि आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होमग्राऊंड असलेल्या नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. एकूण १५१ जागा असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये भाजपाने ७५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिंदेसेना तीन जागांवर आघाडी घेतली आहे. येथे भाजपाला आव्हान देणाऱ्या काँग्रेसने २६ जागांवर आघाडी घेतली आहे.
नागपूर महानगपालिकेच्या मतमोजणीमधून आतापर्यंत समोर आलेल्या कलांमधून येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा करिष्मा चालल्याचे दिसत आहे. १५१ जागा असलेल्या नागपूर महानगरपालिकेमध्ये बहुमतासाठी ७६ जागांची आवश्यकता असून, भाजपाने आतापर्यंत ७५ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे उर्वरित मतमोजणीमधून भाजपा सहज बहुमताचा टप्पा गाठेल असे दिसत आहे.
तर नागपूरमध्ये भाजपासमोर मोठं आव्हान उभं करणाऱ्या काँग्रेसची सुरुवातीच्या कलांमध्ये मोठी पीछेहाट होताना दिसत आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये काँग्रेसला २६ जागांवर आघाडी मिळाली आहे.
दरम्यान, नागपूर महानगरपालिकेच्या १५१ जागांसाठी सुमारे ९९३ उमेदवार रिंगणात असून, काल नागपूरमध्ये ५१.३८ टक्के एवढं मतदान झालं होतं. मतदानानंतर समोर आलेल्या विविध एक्झिट पोलमधून नागपूरमध्ये भाजपाला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.