शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
3
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
4
किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
5
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
6
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
7
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
8
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
9
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
10
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
11
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
12
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
13
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
14
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
15
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
16
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
17
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या
18
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
19
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
20
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप

एलईडीच्या दिव्याखाली अंधार !

By admin | Updated: August 22, 2015 02:55 IST

शहरातील मुख्य रस्त्यांवरील २६ हजार ७०० पथदिवे बदलून एलईडीचे दिवे लावण्याचा पथदर्शी प्रकल्प पूर्ण झालेला नाही.

नागपूर: शहरातील मुख्य रस्त्यांवरील २६ हजार ७०० पथदिवे बदलून एलईडीचे दिवे लावण्याचा पथदर्शी प्रकल्प पूर्ण झालेला नाही. या पथदर्शी प्रकल्पातून किती ऊर्जा बचत झाली, महापालिकेला किती आर्थिक फायदा झाला याचे आॅडिट झाले नाही. असे असताना महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी शहरातील उर्वरित १ लाख पथदिवे बदलून एलईडीचे दिवे लावण्यासाठी तब्बल १३० कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. काँग्रेस नगरसेवकांनी केलेला विरोध बाजूला सारत बहुमताच्या आधारावर संबंधित विषय शुक्रवारी महापालिकेच्या सभेत मंजूर करण्यात आला. महापालिकेनुसार शहरात १ लाख २६ हजार ७०० पथदिवे आहेत. ऊर्जा बचतीच्या उद्देशाने सर्व पथदिवे बदलून तेथे एलईडीचे दिवे लावण्याचा महपालिकेचा मानस आहे. यासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून २६ हजार ७०० पथदिवे एलईडीचे करण्यासाठी महापालिकेने एका कंपनीला कंत्राट दिला होता. हे सर्व पथदिवे डी.पी. रोड, रिंग रोड अशा मुख्य रस्त्यावरील होते. संबंधित कंपनीला १८ महिन्यात काम करायचे होते. पण १४ महिने होऊन कंत्राटदाराने फक्त ४८० दिवे बदलले आहेत. उर्वरित २६ हजार २०० दिवे चार महिन्यात बदलायचे आहेत. असे असतानाही प्रशासनाने शहरातील उर्वरित १ लाख २६ पथदिवे बदलण्यासाठी १३० कोटी खर्च करण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव शुक्रवारी महापालिकेच्या सभेत सादर केला. या प्रस्तावाला काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी विरोध केला. एलईडी लाईट लावण्याच्या पथदर्शी प्रकल्पाचेच काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या प्रकल्पाचे फायदे कळलेच नाही. कागदोपत्री नोंद झाली नाही. ऊर्जा बचतीचे आॅडिट झालेले नाही. असे असतानाही उर्वरित १ लाख दिवे बदलण्यासाठी प्रस्ताव सभागृहात आणला जात आहे. यावर १३० कोटी रुपये खर्च करणार आहेत. त्यासाठी कंत्राट दिले जात आहेत. एक पथदर्शी प्रकल्पच पूर्णत्वास गेला नाही तर लगेच एवढा मोठा कंत्राट काढण्याची गरज काय ? असा सवाल त्यांनी केला. दरवर्षी २० कोटींचे दिवे बदला. एक एक झोन घ्या. त्यानुसार किती ऊर्जा बचत झाली ते स्पष्ट होईल. चार वर्षात बचतीच्या निधीतून उर्वरित कामे करता येतील. त्यासाठी एकाचवेळी महापालिकेच्या तिजोरीतून १३० कोटी रुपये खर्च करण्याची गरज नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. काँग्रेसच्या सर्व सदस्यांनीही आक्षेप नोंदविला. विरोधानंतरही बहुमताच्या आधारावर विषय मंजूर करण्यात आला. (प्रतिनिधी)