शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

अमली पदार्थाच्या विळख्यात तरुणाई

By admin | Updated: June 26, 2016 02:51 IST

क्षणिक सुखासाठी तरुणाई व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकली असल्याचे चित्र आहे.

अमली पदार्थ सेवनविरोधी दिन : जनजागृतीची गरजनागपूर : क्षणिक सुखासाठी तरुणाई व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकली असल्याचे चित्र आहे. या विळख्यातून तरुणाईला बाहेर काढणे कठीण असून, यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे. अपघातात बळी पडणारे, गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्यांमध्ये २० ते ३० वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांच्या रेकॉर्डवरून दिसून येते.आॅनलाईनद्वारे औषधांची मागणीअमली पदार्थांच्या तस्करीसाठी विविध मार्ग अवलंबिले जातात. आता आॅनलाईन फार्मसी वा इंटरनेट फार्मसी हा नवा मार्ग विकसित झाला आहे. यातून एखादी व्यक्ती घरबसल्या जगातील कुठल्याही कोपऱ्यातून हे पदार्थ खरेदी करू शकतो. हे सगळे सार्वजनिक स्तरावर होत आहे. अमली पदार्थांचे सेवनाने स्मरणशक्ती वाढते, असा गैरसमज पसरवला जात आहे. त्यामुळे मुले नवनवीन पदार्थांच्या व्यसनाच्या अधीन होत आहेत. आज ही मोठी सामाजिक समस्या बनली आहे.आज अमली पदार्थांचे सेवन आणि तस्करीला आळा घालण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसारख्या संस्था एक महत्त्वपूर्ण संस्था म्हणून झटत आहे. जगजागृती अभियान आणि प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते. आपले जीवन सुंदर बनवा, अमली पदार्थांना नव्हे तर आरोग्याला महत्त्व द्या, असा संदेश युवकांपर्यंत पोहोचवला जातो. दुष्परिणामाविषयी जनजागृती आवश्यककेवळ जिज्ञासेपोटी अमली पदार्थांची चव चाखणारे आज या गर्तेत सापडले आहेत. २६ जूनला जगभरात अमली पदार्थ सेवनविरोधी दिन पाळण्यात येतो. या विळख्यात गटांगळ्या खाणाऱ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामाविषयी जागृती करण्यासंबंधी या दिवसाचे महत्त्व आहे. अनेक कार्यक्रमातून याविषयी जनजागृती आणि या पदार्थांपासून दूर कसे राहावे, तसेच आपल्या प्रकृतीविषयी गंभीर राहण्याविषयी सावध केले जाते. शैक्षणिक संस्थांबरोबरच इतर सेवाभावी संस्थाही या कामात पुढाकार घेत आहेत. यात आता सामान्य माणसांचाही सहभाग असणे अपरिहार्य बनले आहे. इतकी ही समस्या जटील बनली आहे.पुनर्वसन कठीण, पण प्रयत्नांनी शक्य अमली पदार्थ हा बहुचर्चित विषय बनला आहे. आज पालकांच्या मनात एक विलक्षण भय सामावले आहे, कारण भावी पिढी नशेच्या गर्तेत आहे. तेव्हा पालक आणि शिक्षकांनी दक्षता बाळगणे आवश्यक आहे. अमली पदार्थांचे शिकार झालेल्यांना समाज एका वेगळ्याच नजरेने पाहत असतो. त्यांचा तिरस्कार करीत असतो. पण त्यांचे पुनर्वसन केले तर समस्यांचा नायनाट होऊ शकतो. पुनर्वसनाच्या उपचारादरम्यान अनेक कठीण समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच पालक आणि समुपदेशकांना भरपूर मेहनत घ्यावी लागते. नशेच्या अधीन झालेल्यांचे पुनर्वसन कठीण असले तरी प्रयत्नाने ते शक्य आहे.