शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पेंचमधील ‘जंगल सफारी’ कुणासाठी?

By admin | Updated: March 6, 2017 01:54 IST

पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने अलीकडेच जंगल सफरीसाठी जंगलात जाणाऱ्या खासगी वाहनांना प्रवेश बंदी करून केवळ जिप्सीची सक्ती केली आहे.

खासगी वाहनांना प्रवेश बंदी का? : पर्यटकांचा सवाल, जिप्सीवाल्यांचे खिसे भरण्यासाठी अफलातून निर्णय जीवन रामावत नागपूरपेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने अलीकडेच जंगल सफरीसाठी जंगलात जाणाऱ्या खासगी वाहनांना प्रवेश बंदी करून केवळ जिप्सीची सक्ती केली आहे. वन विभागाच्या या निर्णयावर अखेर ‘जंगल सफारी’ कुणासाठी सामान्य पर्यटकांसाठी की, जिप्सीवाल्यांचे खिसे भरण्यासाठी, असा प्रश्न सामान्य पर्यटक उपस्थित करू लागला आहे. माहिती सूत्रानुसार पेंच येथील यापूर्वीचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षकांनी हा अफलातून निर्णय घेतला होता. या निर्णयाने ‘जंगल सफारी’ ही सामान्य पर्यटकांच्या आवाक्याबाहेर झाली आहे. विशेष म्हणजे, वन विभागाने मागील काही वर्षांत आपला खजिना भरण्याच्या हव्यासापोटी जंगल सफारीच्या प्रवेश शुल्कात सुद्धा मनमानी वाढ केली आहे. यातच आता खासगी वाहनांवर प्रवेश बंदी घातल्याने गरीब आणि सामान्य पर्यटन हा जंगल सफारीपासून वंचित राहत आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाचा विचार केला असता, येथे जंगल सफारीसाठी सिल्लारी, कोलितमारा, चोरबाहुली, खुबाळा, खुर्सापार व सुरेवानी असे सात गेट तयार करण्यात आले आहेत. यापैकी शिल्लारी गेटवरून दररोज (सकाळ-संध्याकाळ) ८० वाहनांना प्रवेश दिला जातो, तसेच कोलितमारा गेटवरून २०, चोरबाहुली गेटवरून ४८, खुबाळा येथून १६, खुर्सापार येथून ३२ आणि सुरेवानी येथून १४ वाहने आत सोडली जातात. यासाठी वन विभागाने निश्चित केलेल्या शुल्कानुसार प्रत्येक पर्यटकाकडून ८० रुपये प्रवेश शुल्क, ३०० रुपये गाईड आणि खासगी जीप-कारसाठी ४४० रुपये आणि मिनी बससाठी ८८० रुपये शुल्क आकारले जात होते. यानुसार एक कुटुंब दोन ते अडीच हजार रुपयांत संपूर्ण जंगल सफारीचा आनंद लुटू शकत होते, परंतु आता जिप्सीची सक्ती केल्याने केवळ जिप्सीच्या भाड्यापोटी त्याला दोन हजार रुपये मोजावे लागतात. या व्यतिरिक्त प्रवेश शुल्क आणि गाईड शुल्क वेगळे द्यावे लागते. अशाप्रकारे एका कुटुंबाचा खर्च हा साधारण साडे तीन ते चार हजार रुपयांपर्यंत जात, असून तो गरीब आणि सामान्य पर्यटकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. पर्यटकांनी फिरविली पाठ पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या या निर्णयाविरुद्ध पर्यटक तीव्र रोष व्यक्त करीत असून, अनेकांनी जंगल सफारीकडे पाठ फिरविली आहे. मागील दोन वर्षांपूर्वी पेंच आणि उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील जंगल सफारीसाठी पर्यटकांच्या रांगा लागत होत्या. परंतु आता या दोन्ही ठिकाणी पर्यटकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने जंगल ओसाड पडले आहे. कधी काळी आॅनलाईन बुकिंग हाऊसफुल राहणाऱ्या या दोन्ही जंगलाकडे आता पर्यटक फिरकायलासुद्धा तयार नाही. याचा अप्रत्यक्ष वन विभागाला फटका सहन करावा लागत आहे. शिवाय त्याचवेळी पर्यटकांकडून खासगी वाहनांवरील प्रवेश बंदी हटविण्याची मागणी केली जात आहे. मात्र त्यांच्या या मागणीची पेंचचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन दखल घेतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.