शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
3
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
4
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
5
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
6
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
7
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
8
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
9
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
10
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
11
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
12
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
13
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
14
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
15
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
16
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
17
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
18
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
19
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

ईव्हीएम सील करताना अडथळा

By admin | Updated: February 18, 2017 02:36 IST

ईव्हीएम मशीनवर उमेदवारांचे नाव व चिन्ह सील करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे

अपक्ष उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल नागपूर : ईव्हीएम मशीनवर उमेदवारांचे नाव व चिन्ह सील करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. प्रभाग क्रमांक ९ ड मधून अपक्ष निवडणूक लढवणारे उमेदवार अनिल खापर्डे यांनी ईव्हीएम मशीन वाढवण्याची मागणी करीत मनपा कर्मचाऱ्यांना पाहून घेण्याची धमकी दिली. यामुळे संबंधित उमेदवाराविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर येथील दादासाहेब कन्नमवार सभागृहात ईव्हीएम मशीनच्या सिलींगचे काम सुरू होते. दरम्यान शुक्रवारी सकाळी ११ वाजता खापर्डे तिथे पोहोचले. त्यांनी त्यांच्या प्रभागात बॅलेट युनिट वाढवण्याची मागणी केली. परंतु तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे खापर्डे यांनी निवडणुकीच्या दिवशी पाहून घेईन, असे सांगितले. यानंतर राजेश वानखेडेने खापर्डे यांच्या विरुद्ध सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. खापर्डे यांच्यावर ३५३ व ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे एका प्रभागात चार उमेदवार आहेत. उमेदवारांच्या संख्येनुसार ईव्हीएम मशीन लावली जात आहे. जास्तीत जास्त एक कंट्रोल युनिट आणि चार बॅलेट युनिट तर कमीतकमी एक कंट्रोल युनिट व दोन बॅलेट युनिट लावले जात आहेत. परंतु अनेक पक्षातील नेते मनपा निवडणूक विभागात येऊन प्रभागात बॅलेट युनिट वाढवण्याची मागणी करीत आहेत.(प्रतिनिधी) भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर गुन्हा दाखल मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसा प्रचारही वाढला आहे. अशा वेळी आचारसंहिता उल्लंघनाचे प्रमाणही वाढले आहे. शुक्रवारी विविध झोन अंतर्गत भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. धंतोली ठाण्यात भाजपा व काँग्रेस तर जरीपटका ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध सार्वजनिक संपत्तीला नुकसान पोहोचविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपक्ष कृष्णा डाहाने यांच्याविरुद्ध पाचपावली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत आचारसंहिता उल्लंघनाच्या ७६ प्रकरणात १३० लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.